मराठी बातम्या /बातम्या /Viral /

उतावळा नवरदेव! स्टेजवरच आऊट ऑफ कंट्रोल झाला वर; ते कृत्य पाहून नवरीही लाजली, VIDEO

उतावळा नवरदेव! स्टेजवरच आऊट ऑफ कंट्रोल झाला वर; ते कृत्य पाहून नवरीही लाजली, VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर एकमेकांना वरमाळा घालतात. यानंतर काही वेळातच नवरदेव आनंदात उड्या मारू लागतो आणि एकटाच स्टेजवर नाचू लागतो (Dance Video of Groom)

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Videos) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची विशेष पसंतीही मिळते. लग्नातील नवरदेव- नवरीचा डान्स, पाहुण्यांची मस्ती, रुसवे-फुगवे आणि भांडणं असे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. मात्र, सध्या एका लग्नातील अनोखा व्हिडिओ (Viral Wedding Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाळा घालताना दिसतात. यात पाहायला मिळतात की वरमाळेच्या या कार्यक्रमानंतर नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल होतो.

बायकोनं पतीला कुत्रा बनवलं; गळ्यात पट्टा घालून फिरवलं, कारण वाचून व्हाल थक्क

व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर एकमेकांना वरमाळा घालतात. यानंतर काही वेळातच नवरदेव आनंदात उड्या मारू लागतो आणि एकटाच स्टेजवर नाचू लागतो (Dance Video of Groom). हे पाहून सुरुवातीला नवरीबाईही अचंबित होते. नवरदेवाला नेमकं काय झालंय हेच तिला सुरुवातीला समजत नाही. मात्र, नंतर आपल्या नवरदेवाचा हा उत्साह पाहून ती लाजते आणि गालात हसू लागते.

" isDesktop="true" id="627608" >

नवरदेवाच्या या दिलखुलास डान्सनं तिथे उपस्थित पाहुण्यांसोबतच नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत. या नवरदेवाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ भरपूर जुना आहे. मात्र, सध्या पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 87 हजारहून अधिकांनी हा मजेशीर व्हिडिओ पाहिला आहे.

समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, VIDEO

यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की कदाचित नवरदेवाची इच्छा पूर्ण झाली आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video