मराठी बातम्या /बातम्या /Viral /लस घ्यायला इतके नखरे! वैतागलेल्या मित्रांनी शेवटी जमिनीवरच आपटलं आणि...VIDEO VIRAL

लस घ्यायला इतके नखरे! वैतागलेल्या मित्रांनी शेवटी जमिनीवरच आपटलं आणि...VIDEO VIRAL

इतक्या मेहनतीने मित्रांनी त्याला लसीकरण केंद्रावर आणलं पण...

इतक्या मेहनतीने मित्रांनी त्याला लसीकरण केंद्रावर आणलं पण...

इतक्या मेहनतीने मित्रांनी त्याला लसीकरण केंद्रावर आणलं पण...

भोपाळ, 22 सप्टेंबर : आजही किती तरी लोक लस (Corona vaccine) घ्यायला घाबरतात (Fear of vaccine). अनेकांना इंजेक्शनची भीती वाटते (Afraid of corona vaccine). अशा लोकांना इंजेक्शन देणं म्हणजे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात एक तरुण इंजेक्शन घ्यायला घाबरतो आहे. त्याचं मित्र कसंबसं धरून त्याला लसीकरण केंद्रापर्यंत आणतात. पण त्याचे नखरे पाहून ते इतके वैतागतात की त्याला धरून जमिनीवरच आपटतात.

सोशल मीडियावर लसीकरणाचा हा मजेशीर (Funny video) व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. कसंबसं धरून एका तरुणाला त्याचे मित्र लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन येतात. पण तरुण इतका हट्टी की तो लसीकरण केंद्राच्या आत जायला तयारच नाही. शेवटी मित्रच असं काहीतरी करतात की तो कधीच विसरणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला या तरुणाला त्याचा एक मित्र धरून लसीकरण केंद्रापर्यंत आणतो. तो त्याला लसीकरण केंद्राच्या आत न्यायला बघतो.

हे वाचा -राष्ट्राध्यक्षांनी फुटपाथवर खाल्ला पिझ्झा; लस न घेतल्याने हॉटेलमध्ये NO ENTRY

पण तरी ज्या तरुणाला लस द्यायला आणलं आहे, तो आपल्या शरीरातील सर्व जोर लावतो आणि लसीकरण केंद्रात आपण जाणार नाही, यासाठी प्रयत्न करतो. ती भिंतीवर आपटतो. लसीकरण केंद्राच्या दरवाजावर पडतो पण तरी लसीकरण केंद्राच्या आत मात्र काही जात नाही.

त्याचे नखरे पाहून शेवटी मित्रही वैतागतात. आणखी दोघे मित्र तिथं येतात. तिघंही त्या तरुणाला धरतात आणि जमिनीवरच आपटताच. त्यानंतर त्याला घट्ट धरून ठेवतात. त्याच्या शर्टाची बाही खाली करतात आणि नर्सला लस द्यायला बोलवताच. नर्स लसीकरण केंद्राच्या बाहेर येऊन तिथंच त्या तरुणाला इंजेक्शन टोचते. त्यानंतर त्याचे मित्र त्याला सोडून देतात.

हे वाचा - कोरोना लस घेत नव्हती म्हणून दोन्ही हातपाय धरले आणि...; महिलेसोबत पुढे काय घडलं VIDEO मध्येच पाहा

पत्रकार अनिल दुबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडाओ पोस्ट केला आहे. लस घेणं आणि देणं किती कठीण काम आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या बुदेलखंडमधील एका लसीकरण केंद्रावरील आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Funny video, Viral, Viral videos