नवी दिल्ली 21 जून: लग्नसमारंभात अनेक विचित्र घटना घडतात. लग्नामध्ये केवळ नवरदेव आणि नवरीच नाही तर त्यांचे नातेवाईकही भरपूर मजा-मस्ती करतात. नवरदेव आणि नवरी स्टेजवर असताना सर्वच पाहुण्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं असतं. अशात त्यांनी काहीही वेगळं किंवा विचित्र केलं की एकच चर्चा सुरू होते. अशात अनेकदा कपल स्टेजवरच रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळतं आणि या घटनांचे व्हिडिओदेखील व्हायरल (Wedding Viral Video) होतात.
नवऱ्यासाठी नाही या गोष्टीसाठी तरुणीनं केलं लग्न?मंडपातील प्रकार पाहून वराती थक्क
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात नवदेव आणि नवरी अतिशय रोमँटिक (Romantic Video) अंदाजात दिसत आहेत आणि एकमेकाला आपली फिलिंग शेअर करत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव हसत आणि लाजत नवरीला उचलून घेतो आणि यानंतर तो तिला घेऊन फिरायला लागतो.
View this post on Instagram
फक्त 28 तासात बनली 10 मजली इमारत! विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO
इतकंच नाही, तर आनंदाच्या भरात तो आपल्या होणाऱ्या बायकोला गालावर सर्वांसमोर किस देतो. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही शूटिंग करायला लागतात. हा नवरदेव रोमँटिक अंदाजात नवरीला उचलून घेत तिच्या माथ्यावर प्रेमानं किस करतो. हे दृश्य पाहून उपस्थित सगळेच आनंदी होतात. सोशल मीडियावर या कपलचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. तर, 22 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Romantic day, Viral video.