नवी दिल्ली 20 जून : सोशल मीडियावर लग्नसमारंभांमधील विनोदी, भावुक करणारे किंवा विचित्र असे अनेक व्हिडिओ (Funny Wedding Video) व्हायरल होत असतात. सध्या इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर आजकाल लग्नाचे बरेच व्हिडिओ ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या असाच एक विनोदी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात नवरीबाई आपल्या दुनियेत रमल्याचं पाहायला मिळतं (Bride Video Viral).
नवरदेवानं एकाच मंडपात दोघींसोबत बांधली लग्नगाठ; भन्नाट आहे Love Story
लग्नसमारंभामध्ये सर्व उपस्थित पाहुण्यांचं संपूर्ण लक्ष हे नवरदेव आणि नवरीकडे असतं. मात्र, अनेकदा नवरदेव आणि नवरी स्टेजवर असं काही करता, ज्यामुळे उपस्थित सगळेच आश्चर्यचकीत होतात आणि आपलं हसू आवरू शकत नाही. सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर सध्या असात एक रिल्स व्हिडिओ ट्रेंड करत आहेत. व्हिडिओमध्ये एक नवरीबाई स्टेजवर बसल्याचं पाहायला मिळतं. फुल ऑन मेकअप आणि नवरीबाईच्या वेशभूषेत सजलेली ही तरुणी लग्नसमारंभात गोलगप्पे खाताना दिसते. एका व्यक्तीनं आपल्या हातामध्ये गोलगप्पे असलेली प्लेट पकडली आहे, तर ही नवरीबाई यातून एक एक गोलगप्पा घेऊन खात आहे.
View this post on Instagram
बापाचं प्रेम पाहून येईल डोळ्यात पाणी;भर पावसात मुलीच्या अभ्यासाठी छत्री घेऊन उभा
आता तुमच्या डोक्यातही असा विचार आला असेल, की ही नवरीबाई तर गोलगप्पे खाण्यात मग्न आहे, मग नवरदेव नेमका कुठे आहे. हा व्हिडिओ शेअर करत दिलेल्या कॅप्शननुसार, नवरदेव यावेळी पुजा करण्यात व्यस्त होता. याच कारणामुळे संधीचा फायदा घेत नवरीबाई आपल्या आवडीच्या पदार्थाचा स्वाद घेण्यात मग्न झाली.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Wedding Vows नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 5 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सर्वांनाच नवरीबाईचा हा अंदाज आवडत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Wedding video