मुंबई, 20 जून: एखादी इमारत बांधण्याचे काम वर्षानुवर्ष रखडल्याचे प्रकार नवे नाहीत. पण एक दहा मजली रहिवाशी इमारत (10 Storey Residential Building within 28 Hours) फक्त 28 तासांमध्ये तयार झाली आहे. होय. तुमचा विश्वास बसत नसेल तरी हे खरं आहे. इंटरनेटवर ही इमारत तयर होण्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral on Internet) झाला आहे. इमारतीच्या पायाभरणीला देखील अनेकदा यापेक्षा जास्त वेळ लागतो. तेवढ्या वेळात ही इमारत तयार झाली आहे.
इतक्या कमी वेळात इमारत उभी करण्याचं काम आपल्या शेजारच्या चीन (China) देशात झाले आहे. चीनच्या चांग्शा शहरामध्ये (Changsha City) हा अविश्वसीय प्रकार घडला आहे. ब्रॉड ग्रुप (Broad Group) या कंपनीनं ही इमारत तयार केली आहे. या कंपनीनं ‘Standard container size, low-cost transportation worldwide. Extremely simple onsite installation’ या कॅप्शनसह हा व्हिडीओ यूट्यूब (YouTube) वर टाकला आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्याने फक्त 28 तास 45 मिनिटामध्ये 10 मजली इमारत उभी केली आहे. हे सर्व कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.
ही कंपनी इमारत बांधण्यासाठी (Living Building System) वापर करत आहे. त्याला प्री फॅब्रीकेटेड कंस्ट्रक्शन सिस्टम (Prefabricated Construction Systems) असं म्हणतात. यामध्ये इमारत तयार करताना मॉड्यूलर युनिट्स (Modular Units) एकत्र केले जातात. याची निर्मिती कारखान्यात केली जाते. त्याला कंटेनरच्या माध्यमातून कंस्ट्रक्शन साईटवर नेले जाते. त्याठिकाणी त्यांना एकमेकांशी जोडण्यात येते. त्याची यंत्रणा पूर्वीच तयार केलेली असते. फक्त बोल्ट घट्ट केले की पूर्ण इमारत तयार होते. 4 मिनिटं 52 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ही सर्व पद्धत दाखवण्यात आली आहे.
हवं तेव्हा शिफ्ट करा सोसायटी
ही इमारत जितक्या वेगाने उभी करण्यात आली आहे, तितख्याच सहजपणे संपूर्ण इमारतीला दुसरीकडे शिफ्टही करता येते, असा दावा कंपनीनं केला आहे. यासाठी फक्त नट बोल्ट घट करणे आणि नव्या ठिकाणी वीज आणि पाण्याचे कनेक्शन देणे आवश्यक आहे. या घराची अंतर्गत सजावटही खूप सुंदर असून सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
तरुणी पडली बॉयफ्रेंडच्या आजोबांच्या प्रेमात; बाळाच्या जन्मानंतर समोर आलं धक्कादायक सत्य
भूकंपातही सुरक्षित इमारत
चीनमध्ये भूकंप, महापूर ही नैसर्गिक संकटं वारंवार येतात. त्या परिस्थितीमध्ये या प्रकारची सहज दुसरिकडं शिफ्ट होणारी इमारत हा चांगला उपाय आहे. ही इमारत भूकंपातही सुरक्षित असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तर ही इमारत म्हणजे कंस्ट्रक्शन क्षेत्रातील क्रांती असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, World news