जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL

भरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL

भरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL

या व्हिडिओमध्ये नवरदेव (Weird Video of Groom) लग्नाच्या स्टेजवर खुर्चीवर बसलेला आहे. यावेळी आपल्या नवरीबाईची वाट पाहत तो तंबाखू (Tobacco) मळत असल्याचं दिसत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 जून: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नसमारंभातील विचित्र घटना तर बहुतेकदा कॅमेऱ्यात कैद होत असतात आणि हे मजेशीर व्हिडिओ (Wedding Videos) लोकांच्या भलतेच पसंतीसही पडतात. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव (Weird Video of Groom) लग्नाच्या स्टेजवर खुर्चीवर बसलेला आहे. यावेळी आपल्या नवरीबाईची वाट पाहत तो तंबाखू (Tobacco) मळत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) ट्यूब इंडियन नावाच्या एक पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. तरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video या नवरदेवाला आपल्या हातानं तंबाखू रगडताना आणि पाहुणे मंडळींसमोरच ती तोंडात टाकताना पाहून सगळेच हैराण झाले. हा मजेशीर व्हिडिओ (Funny Video) आतापर्यंत 23 हजारपेक्षाही अधिकांनी पाहिला आहे. तर, अनेकांनी लाईक केला आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट करून प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकजण यावर कमेंट करून नवरदेवावर टीका करत आहेत, तर अनेकजण आपल्या मैत्रिणींना यात टॅग करत “ग्रूम फॉर यू” असं लिहित आहेत.

जाहिरात

असं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा? नवरदेवाला लगावली कानशिलात याआधीही एप्रिल महिन्यात ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या एका व्यक्तीचा तंबाखू मळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ क्लिपमध्ये हा व्यक्ती रुग्णालयातील बेडवर झोपलेला दिसत होता. एका नर्सनं त्याचं ऑक्सिजन मास्क पकडून ठेवलं होतं, तर दुसरी त्याच्या पायाजवळ उभा होती. हा रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात असूनही आपल्या हातानं तंबाखू मळताना व्हिडिओमध्ये दिसत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात