लखनऊ 22 जून: नुकतंच समोर आलेल्या एक घटनेमध्ये नव्या नवरीनं सासरी पोहोचताच गाडीतून उतरल्यानंतर नवरदेवाच्या कानशिलात लगावली (Newly Wed Wife Slaps Her Husband) आहे. इतकंच नाही तर सासरी पोहोचताच तिनं नवरीचे कपडे आणि मेकअप काढून साध्या कपड्यात आपल्या घराचा रस्ता धरला आणि माहेरी परतली. यानंतर प्रकरण थेट पोलीस (Police) ठाण्यात पोहोचलं. बराच वेळ पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच पर्याय निघाला नाही. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जौनपूरमधील (Jaunpur News) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना खुटहन ठाणा क्षेत्रातील लवायन गावात रविवारी घडली आहे. सासरी स्वागताच्या वेळीच नवरीनं केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. ही बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली आणि आतापर्यंत केवळ अंदाज लावले जात आहेत. ही संपूर्ण घटना प्रेम प्रकरणामुळे झाल्याचं म्हटलं जात आहे. अमरावती: घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ हिंदुस्तानमध्ये आलेल्या वृत्तानुसार, लवायन गावातील नवरदेवाची वरात नवरीच्या घरी पोहोचली तेव्हा अगदी आनंदात हा विवाहसोहळा पार पडला. नवरीनंही शांतपणे नवरदेवासोबत सात फेरे घेतले. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी पाठवणीनंतर सासरवाडीत पोहोचलेल्या नवरीनं नवरदेवाच्या कानशिलात लगावल्यानं एकच चर्चा सुरू झाली. गृहप्रवेशाच्यावेळीच नवरीनं हे कृत्य केलं. हास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात जौनपूरमध्ये लग्नसमारंभादरम्यान विचित्र घटना घडण्याची अनेक प्रकरणं सतत समोर येत आहेत. दहा दिवस आधीच एका लग्नसमारंभात वरमाळा घालतानाच नवरदेवाकडील एक युवक स्टेजवर चढू लागला. मात्र, नवरीकडच्या लोकांनी नकार दिल्यानं दोन्हीकडील लोकांमध्ये मारहाण सुरू झाली. रागात असलेल्या नवरदेवानंही नवरीला कानशिलात लगावली. प्रकरण इतकं टोकाला पोहोचलं की पोलिसांनाच यात हस्तक्षेप करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.