मराठी बातम्या /बातम्या /Viral /

असं Pre-wedding Shoot नको गं बाई! कपलसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही करू नका अशी चूक

असं Pre-wedding Shoot नको गं बाई! कपलसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही करू नका अशी चूक

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

अशा पद्धतीने प्री-वेडिंग फोटोशूट करणं नवरा-नवरीला पडलं महागात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India
  • Published by:  Priya Lad

तिरुवनंतपुरम, 09 डिसेंबर : सध्या लग्नाचं सिझन आहे. लग्न म्हटलं की फोटो आलेच आणि फोटो म्हणजे फक्त लग्नाचेच नव्हे तर त्यात प्री आणि पोस्ट वेडिंग फोटोशूटही आलंच. तुम्ही किंवा ओळखीतील कुणी अशा प्री-वेडिंग फोटोशूटच्या तयारीत असेल तर सावध राहा. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या कपलसोबत असं काही घडलं की वाचूनच तुम्हाला धक्का बसेल. केरळमधील प्री-वेडिंग फोटोशूटचं हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

तुम्ही पाहिलं असेल कुणी समुद्र, कुणी डोंगर, कुणी किल्ले अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्री-वेडिंग करतं. प्री-वेडिंगमध्ये काही तरी हटके करण्याचा प्रयत्न प्रत्येक कपलचा आणि त्यांचे फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचाही असतो. पण असं काही तरी करण्याच्या नादात तुम्हाला तर काही होणार नाही ना याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. आता या केरळमधील कपलचंच पाहा.

हे वाचा - वरात दारात अन् नवरी प्रियकरासोबत फरार; अखेर नवरदेवाने नवरीच्या बहिणीकडेच केली अजब मागणी

हे कपल एका पाण्याने भरलेल्या खदानाजवळ फोटोशूट करायला गेलं. खदानाच्या किनाऱ्यावर उभं राहून कपल फोटोशूट करत होतं. त्यावेळी नवरीचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. खोल दरीत असलेल्या पाण्यात ती पडली. नवरदेवाने क्षणाचाही विचार न करता त्यानेही नवरीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. जवळपास  50 फूट खोल जलासय होतं.

हे सर्व पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा केला. त्यानंतर पोलिसांना आणि बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कसंबसं या दाम्पत्याला वाचवण्यात आलं आहे. दुर्घटनेत महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. इंडिया न्यूज डॉट कॉमच्या वृत्तानुसार या दाम्पत्याचा लग्नसोहळा आता तीन महिने पुढे ढकलण्यात आला आहे.

First published:

Tags: Kerala, Marriage, Viral, Wedding