मुंबई, 09 डिसेंबर : पती-पत्नीमध्ये वाद होतात; मात्र काही वेळा त्याची परिणती घटस्फोटात होते. अशा वेळी पैशांची मागणीही होतेच. चीनमध्ये एका पतीने आपले पैसे परत मिळवण्यासाठी चक्क लाउडस्पीकर व बॅनरचा वापर केला. चीनमध्ये पतीकडून पत्नीला हुंडा देण्याची प्रथा आहे. त्यानुसार होऊ नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी ली हिच्याशी लग्न करण्यासाठी जवळपास 50 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांचे खटके उडू लागले व ली घर सोडून गेली. त्यानंतर पतीने पत्नीच्या घराबाहेर बॅनर लावला आणि चक्क लाउडस्पीकरवरून पैसे देण्याची मागणी केली.
Jimu Newsच्या वृत्तानुसार, चीनच्या हेनान प्रांतात राहणाऱ्या 25 वर्षीय होऊ याने ली नावाच्या मुलीसोबत लग्न केलं. त्यांची ओळख 2021मध्ये ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर थोड्याच दिवसांत दोघांमध्ये भांडण झालं व ली घर सोडून गेली. त्यांनी घटस्फोटासाठीही अर्ज केला; मात्र तो रद्द करण्यात आला. त्यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज केला. पुढच्या महिन्यात त्यावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - ''वो स्त्री है कुछ भी कर सकती है'', बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच
होऊच्या म्हणण्यानुसार, त्याने लग्नात 58 लाख रुपये खर्च केले होते. त्यापैकी 18 लाख रुपये त्याने नातेवाईक व इतरांकडून गोळा केले होते व बाकीचे त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी जमवले होते. आता त्यापैकी 16 लाख रुपये पत्नीनं परत करावेत, असं त्याचं म्हणणं आहे. त्यासाठी त्याने पत्नीच्या घराबाहेर पैशांची मागणी करणारा एक बॅनर लावला आहे. तसंच तिच्या घराबाहेर एक लाउडस्पीकर लावून त्यावरून तो पैशांची मागणी करतो.
चीनमध्ये पतीकडून पत्नीला हुंडा देण्याची प्रथा आहे. त्यानुसार, होऊ आणि ली यांच्या लग्नामध्ये होऊ यानं ली हिला एक कार, काही रोख रक्कम व भेटवस्तू दिल्या होत्या. त्यापैकी ली हिला दिलेले दागिने तिने परत करावेत अशी मुलाकडच्यांची मागणी आहे. त्या दागिन्यांची किंमत 5 लाख रुपये असून, त्याशिवाय रोख रक्कम 11 लाख रुपयांची आहे. असे एकूण 16 लाख रुपये मुलाकडच्यांनी मुलीकडे मागितले आहेत. होऊ याने लग्नाचा अतिशय दिमाखदार सोहळा केला होता; मात्र लग्नानंतर थोड्याच दिवसांत नवरा-बायकोचे वाद होऊ लागले. त्यामुळे ली घर सोडून गेली. आता हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे; मात्र लग्नासाठी भरपूर खर्च झाल्याने आता त्यातली काही रक्कम तरी परत मिळावी, असं नवऱ्याचं म्हणणं आहे. त्यासाठी त्याने ही अनोखी युक्ती केली आहे. चीनमधल्या सोशल मीडियावर याची बरीच चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral, Viral news