जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मेहुण्यांनी दाजीला अक्षरशः खुर्चीवरुन खाली ओढलं आणि..., कधीही पाहिला नसेल असा Wedding Video

मेहुण्यांनी दाजीला अक्षरशः खुर्चीवरुन खाली ओढलं आणि..., कधीही पाहिला नसेल असा Wedding Video

मेहुण्यांनी दाजीला अक्षरशः खुर्चीवरुन खाली ओढलं आणि..., कधीही पाहिला नसेल असा Wedding Video

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की काही तरुणी नवरदेवाच्या पायातील चप्पल काढून घेण्यासाठी त्यालाच खुर्चीवरुन ओढत आहेत आणि जबरदस्ती चप्पल काढण्याचा प्रयत्न करत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : लग्नात सगळेच लोक आपल्या पद्धतीने मस्ती करत आनंद लुटत असतात. मात्र सगळ्यात अनोखी मस्ती आणि मेहुणी आणि दाजीची. लग्नात आपल्या दाजीसोबत मस्ती करणाऱ्या अनेक मेहुण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Wedding Video Viral) होत राहतात. मात्र, आज आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तसा मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Groom) कदाचित तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल. लग्नात ‘जूते चुराई’ म्हणजेच नवरदेवाची चप्पल चोरण्याचा खेळ सर्वात खास असतो. OMG! चक्क माकडाने चालवली सायकल; VIDEO पाहून येईल बालपणीची आठवण या खेळात मेहुण्या आपल्या दाजीची चप्पल चोरतात आणि याच्या बदल्यात हवी तितकी रक्कम मागतात. लग्नात दाजीकडून ही रक्कम घेण्यासाठी मेहुण्या काहीही करायला तयार असतात. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ज्या मेहुण्या दिसतात, त्या अतिशय आगळ्यावेगळ्या आहेत. या मेहुण्यांनी प्रेमाने दाजीची चप्पल न मिळाल्याने त्याच्यासोबत जे काही केलं, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

जाहिरात

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की काही तरुणी नवरदेवाच्या पायातील चप्पल काढून घेण्यासाठी त्यालाच खुर्चीवरुन ओढत आहेत आणि जबरदस्ती चप्पल काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या मस्तीच्या नादात नवरदेव अक्षरशः खुर्चीवरुन खाली कोसळतो. मेहुणी दाजीला खाली पाडून त्याच्या पायातील चप्पल काढून घेते आणि तिथून पळ काढते.

दुकानातील ट्रायल रूमचं छत तोडून आत शिरला अजगर; रेस्क्यू टीमवरच हल्ला, VIDEO

सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये. अनेकजण हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करत आहेत. यासोबत अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत मेहुण्यांच्या या अनोख्या अंदाजाचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात