जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! चक्क माकडाने चालवली सायकल; VIDEO पाहून येईल बालपणीची आठवण

OMG! चक्क माकडाने चालवली सायकल; VIDEO पाहून येईल बालपणीची आठवण

OMG! चक्क माकडाने चालवली सायकल; VIDEO पाहून येईल बालपणीची आठवण

या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक माकड सायकल चालवत आहे. तर दुसरं आरामात मागे बसून सायकल राईडची मजा घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : माकड हे अतिशय चंचल आणि इकडून - तिकडे उड्या मारणारा प्राणी म्हणून ओळखलं जातं. मस्तीसोबत अनेकदा हे प्राणी मोठमोठे प्रतापही करतात. शहरात माकडं अतिशय कमी पाहायला मिळतात, मात्र गावांकडे आजही मोठ्या संख्येनं माकडं दिसतात. सोशल मीडियावर माकडांचे निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. यातील काही मजेशीर असतात तर काही भावुक करणारे असतात. सध्या माकडाचा असाच एक मजेशीर व्हिडिओ (Cycling Video of Monkey) समोर आला आहे. यात माकड सायकल चालवताना दिसत आहे आणि दुसरं एक माकड मागे बसलेलं आहे. OMG! एकसोबतच 2 दुचाकी चालवताना दिसला युवक, VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं लहानपणी तुम्हीही सायकल चालवली असेल. कधी एकट्याने तर कधी मागे कोणालातरी बसवून सगळेच लहानपणी सायकल चालवण्याची मजा घेतात. माकडांचा हा व्हिडिओदेखील असाच आहे. हा व्हिडिओ (Monkey Viral Video) पाहून तुम्हीही आपल्या बालपणीच्या आठवणीत रमाल. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक माकड सायकल चालवत आहे. तर दुसरं आरामात मागे बसून सायकल राईडची मजा घेत आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की माकड कशाप्रकारे सायकल चालवत आहे. व्हिडिओ पाहून वाटतं की ते या कामात एक्सपर्ट आहे. कारण सायकल चालवायला शिकताना लहान मुलांनाही भरपूर कष्ट घ्यावे लागतात. आता या माकडाला हे शिकण्यासाठी किती वेळ लागला, याची माहिती नाही. मात्र ते अगदी आरामात सायकल चालवत आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुमचंही मन जिंकेल. दुकानातील ट्रायल रूमचं छत तोडून आत शिरला अजगर; रेस्क्यू टीमवरच हल्ला, VIDEO सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ earthlocus नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 40 मिलियन म्हणजेच 40 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 10 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत आणि या माकडाचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात