लखनऊ, 28 फेब्रुवारी : 26 फेब्रुवारी 2023 ला लग्न झालं. 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 3 वाजता वरात निघाली, सकाळी 6 वाजता नवरदेव आपल्या नवरीला वाजतगाजत घरी घेऊन आला. लग्नामुळे घरातील वातावरण आनंदात होतं. अजूनही लग्नानंतरचे काही कार्यक्रम सुरू होते. पण लग्नानंतर नवरदेवाने अशी घाई केली की ती त्याच्या जीवावर बेतली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरीच्या हातावरची मेहंदीही गेली नाही, अंगावरची हळद उतरली नाही तोच तिचं कुंकू पुसलं गेलं, ती विधवा झाली. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही धक्कादायक घटना आहे. मैनापुठी गावातील 22 वर्षांचा सनी ज्याचं लग्न हापूडच्या गालंदमधील पूनमसोबत झालं. रविवारी दोघांचंही अगदी धुमधडाक्यात लग्न पार पडलं. सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास पूनमची माहेरहून सासरी पाठवणी झाली. सनी आपली नवरी पूनमला घेऊन सकाळी 6 वाजता आपल्या घरी पोहोचला. नवदाम्पत्याचा गृहप्रवेश झाला. त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. सून घरी आल्यानंतर घरी सर्वजण आनंदात होते. लग्नानंतरचे आणखी काही कार्यक्रमही होते. संध्याकाळी संगीत कार्यक्रम होणार होता. सर्वजण त्याचीच तयारी करत होते. पण काही तासांत होत्याचं नव्हतं झालं. अचानक नवरदेवाच मृत्यू झाला. VIDEO - ‘पप्पा मम्माला मारू नका’, प्रेमाने सांगूनही ऐकले नाही; शेवटी संतप्त लेकीने चिमुकल्या हातांनी वडिलांना… सनी शेजारील संदीपसोबत सामान आणायला सरधनाला गेला. संध्याकाळी तो घरी परतत होता. तेव्हा सरूरपूर पोलीस ठाण्याजवळ त्याचा अपघात झाला. तिथं रस्त्याचं काम सुरू होतं, त्यामुळे ते दोघं असलेल्या बाईकचं नियंत्रण सुटलं आणि बाईक घसरली. संदीपला किरकोळ दुखापत झाली पण सनी गंभीररित्या जखमी झाला. दोघांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. सनीची गंभीर परिस्थिती पाहून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रस्त्यातच त्याने जीव सोडला.
दैनिक भास्करच्या वृत्ता नुसार पोलिसांनी सांगितलं की, बाईकचा वेग जास्त असल्याने बाईक अनियंत्रित झाली आणि पडली. माहितीनुसार या लोकांनी हेल्मेटही घातलं नव्हतं.
अरे बापरे! नवरदेवाला झालंय तरी काय? मंडपात असं काही करू लागला की नवरीसह सर्वांना फुटला घामलग्नाची लगबग असलेल्या वर आणि वधू दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या बोहल्यावर चढून सकाळी वरातीत नाचत आलेला नवरदेव सर्वांना रडवून सरणावर गेला. सुखदुःखात साथ देण्याचं वचन जिला त्याने दिलं त्या जोडीदाराला संसार सुरू होण्याआधीच सोडून गेला.