मुंबई, 09 फेब्रुवारी : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी वर-वधूची ग्रँड, हटके, धमाकेदार एंट्री, कधी त्यांचा डान्स, कधी त्यांच्यातील भांडणं असे एक ना दोन किती तरी व्हिडीओ असतात. मात्र सध्या लग्नाचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण हादरले आहेत. लग्नमंडपात नवरदेव असं काही करू लागला की त्याचं कुटुंब, नवरी आणि इतर सर्वांनाच घाम फुटला. या नवरदेवाला नेमकं झालं तरी काय, असा प्रश्न तुम्हालाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडेल.
लग्नात जेव्हा नवरा-नवरी एकमेकांसमोर येतात. तेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड वाढते. काही कपल तर इतके इमोशनल होतात की त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. एकमेकांना पाहून त्यांना रडूच कोसळतं. तर काही वेळा नवरीला पाहून नवरदेवाचा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो. या व्हिडीओतील नवरदेव मात्र विचित्र कृत्य करू लागला आहे. त्याच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
हे वाचा - आता हद्दच झाली! 'शुभमंगल सावधान'ऐवजी वेगळ्याच घोषणांनी दुमदुमला मंडप; पाहा Wedding Video
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी शेजारीशेजारी बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचं कुटुंब, नातेवाईक आहेत. समोर पंडित आहेत. लग्नाच्या विधी सुरू आहेत. अचानक ढोल वाजू लागतो आणि ढोलचा आवाज ऐकून नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल होतो. सुरुवातीला तो जागेवर बसूनच नाचू लागतो. त्यानंतर तो उभा राहतो आणि जागेवर गोलगोल फिरत डान्स करू लागतो. विजेचा झटका लागावा, फिट यावी किंवा अंगात यावं असंच हा नवरदेव करतो आहे.
त्याला पाहून वधू-वराचं कुटुंबही हैराण होतं. एक व्यक्ती त्याला खाली बसण्याची विनंतीही करते. नवरीबाई तर नवरदेवाकडे पाहतच राहते. तिला धक्काच बसतो. ती आपल्या तोंडावरही हात ठेवते.
हे वाचा - घूंघट के नीचे...! लग्नानंतर नववधूला पाहताच सासरचे हादरले, नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल
mnraj_bai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. जेव्हा नवरदेव नवरीला पाहतो तेव्हा तो आनंदाने असं नाचतो, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी यावर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video