मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - 'पप्पा मम्माला मारू नका', प्रेमाने सांगूनही ऐकले नाही; शेवटी संतप्त लेकीने चिमुकल्या हातांनी वडिलांना...

VIDEO - 'पप्पा मम्माला मारू नका', प्रेमाने सांगूनही ऐकले नाही; शेवटी संतप्त लेकीने चिमुकल्या हातांनी वडिलांना...

बापलेकीचा व्हिडीओ व्हायरल.

बापलेकीचा व्हिडीओ व्हायरल.

आईला मारणाऱ्या वडिलांना चिमुकल्या लेकीने शिकवला चांगलाच धडा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 28 फेब्रुवारी : लहान मुलांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बापलेक किंवा मायलेक किंवा फक्त मुलांचे हे व्हिडीओ असतात. अशाच आईबाबा आणि लेकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात नवरा आपल्या बायकोला मारतो आहे. त्यावेळी त्यांची लेक त्यांच्यामध्ये पडते. आईला मारणाऱ्या बाबाला ती सुरुवातीला प्रेमाने समजावते. पण तरी वडील ऐकत नाही शेवटी ती जे करते ते धक्कादायक आहे.

तसं मुलींना नेहमी पापा की परी म्हटलं जातं. अशीच पाप की परी असलेली ही चिमुकली जिचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे पण तितकंच आईवरही. त्यामुळे वडिलांना आपल्या आईला मारताना पाहून ती संतप्त झाली. तिला इतका राग आला की तिने वडिलांना चांगलाच धडा शिकवला आहे. या मुलीने जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

अजब शासन! चिमुकल्यांना चमच्याऐवजी हाताने भरवणं गुन्हा; कायदा मोडला तर मोठी कारवाई

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती दिसते आहे, जी बेडवर बसली आहे. तिच्या समोर त्याची बायको बसली आहे आणि त्या दोघांच्या मध्ये एक क्युटशी लहान मुलगी आहे. ती व्यक्ती समोर बसलेल्या आपल्या बायकोवर हात उचलते. तेव्हा ती मुलगी पुढे येते आणि आपल्या वडिलांना समजावते. पप्पा मम्मीला मारू नका. मारायचं नाही हा. असंच ती बोट दाखवत पण प्रेमाने समजावते.

तिचे वडील आधी शांत राहून तिचं सर्वकाही ऐकून घेतात पण ते पुन्हा आपल्या बायकोला मारतात. तेव्हा मात्र या चिमुकलीचा राग अनावर होतो. पापा की परी आपल्या पप्पावरच हात उचलते. चिमुकल्या हातांनी सुरुवातीला वडिलांच्या गालावर मारते. त्यानंतर दोन्ही हातांनी ती वडिलांना मारतानाही दिसते.

VIDEO - लेकाला निरोप देताना बाबांना आलं गहिवरून; आधी मुलाला गाडीत बसवलं, नंतर त्याच ट्रेनसमोर वडील...

तसं या व्हिडीओत नवऱ्याने बायकोला केलेली मारहाण खरी नाही. म्हणजे तो आपल्या मुलीची प्रतिक्रिया पाहण्यासाठी मजेत आपल्या बायकोला मारतो आहे. तिला मारण्याची अॅक्टिंग करतो आहे.  पण निरागस चिमुकलीला ते खरं वाटतं आणि वडिलांना समजावते, नंतर धमकावते आणि त्यांच्यावर हातही उचलते. आईसाठी ती आपल्या बाबाशी भिडते.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. मायलेकीच्या बाँडिंगचंही कौतुक केलं जातं. एका युझरने हिला मम्मा की परी म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं किंवा तुमच्याकडेही असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Daughter, Father, Parents, Parents and child, Small child, Viral, Viral videos