नवी दिल्ली 16 जून : सोशल मीडियावर (Social Media) काही मजेशीर तर काही गंभीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ लग्नसमारंभांमधील असतात. यातील काही व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळून हसवतात तर काही व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यावर विश्वास ठेवणंही अवघड जातं. तर, काही व्हिडिओ असे असतात जे आपण वारंवार पाहातो. इतकंच नाही तर या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या मजेशीर कमेंटही करतात. अशाच एका लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे, की लग्नाचा (Marriage) दिवस हा नवरदेव आणि नवरी दोघांसाठीही खास असतो. हा दिवस कायम आठवणीत राहावा यासाठी लोक प्रयत्न करतात. अनेकदा यासाठी करण्यात आलेल्या गोष्टींतं कौतुक होतं तर अनेकांना टीकेचा सामनाही करावा लागतो. मागील काही दिवसांपासून लग्न समारंभातच कपलचे रागावलेले किंवा चिडलेले व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळते.
आपले जुने कपडे विकून लाखोंची कमाई करते ही तरुणी; अंतर्वस्त्राला सर्वाधिक मागणी
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव आणि नवरी लग्नासाठी स्टेजवर बसलेले आहेत. मात्र, नवरीकडचा कोणीतरी नातेवाईक नवरदेवाची मस्करी करू लागतो. नवरदेव त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, मात्र हा नातेवाईक काही थांबत नाही. अखेर वैतागून हा नवरदेव उभा राहातो आणि या नातेवाईकाला मारण्यास सुरुवात करतो. हे पाहून उपस्थित सगळेच हैराण होतात. नवरीदेखील अवाक होऊन हे सगळं पाहात बसते.
View this post on Instagram
VIDEO - जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट
हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर निरंजन महापात्रानं शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेक युजर्सनं यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरनं म्हटलं, की हे दृश्य मजेशीर आहे. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, की बिचारा नवरदेव आधीच चिंतेत होता त्यामुळेच त्याला मारलं. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Shocking video viral