Home /News /viral /

आपले जुने कपडे विकून लाखोंची कमाई करते ही तरुणी; अंतर्वस्त्राला सर्वाधिक मागणी, काय आहे प्रकरण?

आपले जुने कपडे विकून लाखोंची कमाई करते ही तरुणी; अंतर्वस्त्राला सर्वाधिक मागणी, काय आहे प्रकरण?

एक महिला स्वतः अतिशय स्टायलिश कपडे घालते. मात्र, हे कपडे कोणाच्या पसंतीस पडल्यास हे कपडे ती विकतेदेखील (Girl Sell Her Old Dresses Online). यातून ती मोठी कमाईदेखील करते.

    लंडन 16 जून : एखादा ड्रेस तुम्हा खूप आवडला मात्र तो दुकानात नाही तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे असेल तर? हा ड्रेस आपल्याला मिळणार नाही, असाच आपला समज होतो. मात्र, एक महिला स्वतः अतिशय स्टायलिश कपडे घालते. मात्र, हे कपडे कोणाच्या पसंतीस पडल्यास हे कपडे ती विकतेदेखील (Girl Sell Her Old Dresses Online). यातून ती मोठी कमाईदेखील करते. या ब्रिटिश महिलेचं नाव Tatiana Bee असं आहे. ती आपले जुने कपडे विकून लाखो रुपयांची कमाई करते. जुने कपडे विकून ती महिन्याला 4 लाखापर्यंतची कमाई करते. हे काम ती साईड बिजनेस म्हणून करत असते. विशेष बाब म्हणजे तिच्या कमाईमधील बहुतेक पैसे हे अंतर्वस्त्र विकून आलेले असतात. तातिआना बी हिनं सांगितलं, की वयाच्या 22 व्या वर्षीच तिनं हे काम सुरू केलं. त्यावेळी ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती आणि तिला पैशांची गरज होती. ती पैसे कमवण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करायची, अशात हा पर्याय तिला सुचला. VIDEO - जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट मेट्रो डॉट को डॉय यूकेवर एक लेख लिहून तिनं आपले अनुभव सांगितले आहेत. तातिआना हिला तिच्या काही मित्रांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली, की लोक वापरलेले कपडे ऑनलाईन विकतात. यानंतर तिनं यावर रिसर्च करण्यास सुरुवात केली. तातिआनाचं म्हणणं आहे, की सुरुवातीला याबद्दल तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तिनं मध्येच हे काम सुरू न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पैशांसाठी अखेर तिनं हे काम सुरू केलं. सुरुवातीला तिला काही संकटांचा सामनाही करावा लागला. मात्र, हळूहळू तिला याची सवय झाली. पहिल्यांदा तिनं सात हजाराची कमाई केली. यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. आता ती यातूनच महिन्याला 1 लाख ते 4 लाखापर्यंतची कमाई करते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Small business, Wearing short clothes

    पुढील बातम्या