• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अजबच! सासू-सासऱ्यांना सूनेवर नाही विश्वास; नातवाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्....

अजबच! सासू-सासऱ्यांना सूनेवर नाही विश्वास; नातवाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्....

या घटनेत घरात जेव्हा लहान बाळ (Baby) आलं तेव्हा आजी-आजोबा आनंदी झाले नाहीत, तर त्यांनी आपल्या सूनेवरच (Daughter-in-law) संशय घेण्यास सुरुवात केली

 • Share this:
  नवी दिल्ली 20 सप्टेंबर : घरात बाळाचा जन्म होणं, ही फक्त आई-वडीलच नाही तर आजी आणि आजोबांसाठीही (Grandparents) आनंदाची बाब असते. मात्र, एका कपलसोबत असं काही घडलं जे अजब (Weird News) होतं. या घटनेत घरात जेव्हा लहान बाळ (Baby) आलं तेव्हा आजी-आजोबा आनंदी झाले नाहीत, तर त्यांनी आपल्या सूनेवरच (Daughter-in-law) संशय घेण्यास सुरुवात केली आणि बाळाची DNA टेस्टही (DNA Test) करून घेतली. हॉटेलमध्येच 3 महिलांकडून तरुणीला जबर मारहाण; संतापजनक घटनेचा VIDEO आला समोर एका व्यक्तीनं आपली ही अजब व्यथा Reddit वर शेअर केली आहे. या व्यक्तीनं सांगितलं, की त्याच्या आई-वडिलांना आपली सून तेव्हापासूनच पसंत नव्हती जेव्हा त्यांनी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. मात्र, तेव्हा हे प्रकरण इतकं गंभीर नव्हतं, जितकं आता झालं आहे. या व्यक्तीच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला आहे मात्र तरीही तिचे सासू-सासरे तिला पसंत करत नाहीत. अमेरिकन व्यक्तीनं सांगितलं, की त्याच्या पत्नीचं नाव सोन्या असून ती वेट्रेस म्हणून काम करते. खूप प्रयत्न करून तिनं या व्यक्तीला होकार दिला. यानंतर सोन्यानं तिला आपल्या घरच्यांना भेटवलं. पहिल्या भेटीतच त्यांनी सोन्याला रिजेक्ट केलं. त्यांना वाटलं की ही आपल्या मुलाचा वापर केवळ ग्रीन कार्डसाठी करत आहे. लग्नानंतर त्यांनी या जोडप्याला आशिर्वादही दिला नाही. आई-वडिलांच्या उपस्थितीशिवायच त्यांनी लग्न केलं आणि वेगळं राहू लागले. OMG! चक्क सापांसोबत खेळत होता व्यक्ती अन्...; हा Video पाहून येईल अंगावर काटा लग्नानंतर दोन वर्षानं या कपलच्या घरी बाळाचा जन्म झाला. यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. या दरम्यान त्यांनी मुलाची डीएनए टेस्टही करून घेतली. जेणेकरून हे समजेल की हा त्यांचाच नातू आहे. जेव्हा या व्यक्तीनं याबाबत आपल्या आईला सवाल केला तेव्हा तिनं सांगितलं, की तिला हे पाहायचं होतं की हे बाळ त्याचंच आहे का. या घटनेनंतर कपलनं त्यांना आपल्या मुलाला भेटवणंच बंद केलं. सोशल मीडियावर अनेकांनी या व्यक्तीचा सपोर्ट करत त्यानं एकदम बरोबर केल्याचं म्हटलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: