मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भारतीयांकडून 2022 मध्ये 'या' गोष्टी सर्वाधिक Google Search, लिस्टमधील नावं धक्कादायक

भारतीयांकडून 2022 मध्ये 'या' गोष्टी सर्वाधिक Google Search, लिस्टमधील नावं धक्कादायक

गुगल सर्च

गुगल सर्च

गुगलला कोणत्या ही प्रकारचा प्रश्न विचारा अगदी कोणताही... तो तुम्हाला त्याचं उत्तर शोधून दाखवतोच. असा एकही व्यक्ती नाही जो गुगलवर काही सर्च करत नसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 08 डिसेंबर : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. त्यापैकी सर्वात महत्वाचा आणि लोकांच्या कामाच आहे तो म्हणजे गुगल. लोकांना काहीही प्रश्न पडला, म्हणजे अगदी काहीही तरी देखील लोक तो गुगलवर सर्च करतात किंवा गुगलला प्रश्न विचारतात. ज्याचं उत्तर शोधण्यासाठी गुगल पुरेपुर प्रयत्न करतो आणि आपल्यापर्यंत पर्यायांच्या मार्फत उत्तर पोहोचवतो.

गुगलला कोणत्या ही प्रकारचा प्रश्न विचारा अगदी कोणताही... तो तुम्हाला त्याचं उत्तर शोधून दाखवतोच. असा एकही व्यक्ती नाही जो गुगलवर काही सर्च करत नसेल.

जगभरातील जवळ-जवळ सगळेच लोक गुगलवर गोष्टी सर्च करतात. माहिती देण्यासोबतच गुगल आपले फोटो-फाईल स्टोरअ करणे, मॅप, ऍप्स यासारख्या गोष्टींची देखील सेवा देतं.

हे ही पाहा : ''वो स्त्री है कुछ भी कर सकती है'', बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच

आता वर्ष २०२२ संपणारच आहे. पण त्या आधी आम्ही तुमच्यासाठी महत्वाची आणि इंट्रेस्टिंग बातमी घेऊन आलो आहोत.

Google ने नुकताच आपला 'इयर इन सर्च 2022' अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात या वर्षातील सर्वात चर्चेत आलेले आणि सगळ्यात जास्त सर्च केले गेलेल्या शब्दांची यादी सादर केली आहे.

ही यादी भारतीयांची आहे. त्यामुळे २०२२ मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं आहे? याची यादी आहे. या यादीमधील काही शब्द तुम्हाला आश्चर्यचकीत करतील.

भारतातही गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. चला पाहू यादी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) हे भारतातील सर्वात जास्त शोधला गेलेला शब्द आहे. 2022 गुगल ट्रेंडिंग सर्चमधील लिस्टमध्ये हा शब्द अव्वल स्थानावर आहे आणि देशातील सर्वाधिक शोधले जाणारे क्रीडा स्पर्धा देखील आहे.

यानंतर, लोकांनी सरकारी वेब पोर्टल CoWIN शोधले आहे. हे ऍप कोरोनाव्हायरस लसींसाठी नोंदणी आणि भेटीची सुविधा प्रदान करते. यासोबतच यावर डिजिटल लसीचे प्रमाणपत्रही दिले जाते.

कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू झालेला फिफा विश्वचषक हा भारतातील तिसरा सर्वाधिक शोधला जाणारा विषय किंवा शब्द आहे.

तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे आशिया चषक आणि ICC पुरुषांच्या T20 वर्ल्ड सारख्या क्रीडा स्पर्धां आहेत.

थोडक्यात काय तर भारतीयांना यावर्षी खेळाचे सर्वाधीक वेड आहे. आश्चर्यकारक म्हणजे बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वातील गोष्टींना स्पोर्टने मागे टाकलं असल्याचं दिसतंय.

बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र : पार्ट वन - शिवा'ने सहावा क्रमांक पटकावला. तर 'KGF: Chapter 2' दक्षिण भारतीय चित्रपट गुगल सर्च लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.

गुगलचा सर्वात लोकप्रिय पर्याय 'निअर मी' हा कोरोनाव्हायरस दरम्यान खूप उपयुक्त ठरला, कारण 2021 आणि 2022 मध्ये 'कोविड व्हॅक्सिन नियर मी' या यादीत अव्वल स्थानावर आहे.

तसेच अनेक लोकांनी शो निअर मी, स्विमिंगपुल निअर मी, वॉटर पार्क निअर मी, थिएटर निअर मी; सारख्या अनेक गोष्टी गुगलवर सर्च केल्या गेल्या आहेत.

2022 मध्ये, संरक्षण उमेदवारांसाठी, NATO (द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन), आणि NFTs (नॉन-फंगीबल टोकन्स) साठी नव्याने सादर केलेल्या अग्निपथ योजनेबद्दल भारतीय अधिक उत्सुक असल्याचे दिसून आले, तर गेल्या वर्षी 'ब्लॅक फंगस म्हणजे काय' हा सर्वाधिक चर्चेचा विषय होता.

2022 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा समावेश आहे, ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

त्यांच्यानंतर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ऋषी सुनक आणि युनायटेड किंगडमचे नवे पंतप्रधान ललित मोदी होते.

First published:

Tags: Google, Research, Social media, Top trending, Viral