बंगळुरू 14 डिसेंबर : कर्नाटकच्या सिरसी येथील हिपानाहल्लीमध्ये एका व्यक्तीने गाईने सोन्याची 20 ग्रॅमची साखळी गिळली (Cow Swallowed Gold Chain). सुरुवातीला तर या व्यक्तीने जवळपास एक महिना गायीच्या शेणावर नजर ठेवली. मात्र, तरीही उपयोग न झाल्याने हा व्यक्ती डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने मेटल डिटेक्टरच्या मदतीने गायीच्या पोटातील साखळी शोधली आणि सर्जरी करून ती बाहेर काढली (Gold Chain Removed from Cow’s Tummy). रोमान्स करत असताना सुरू झालं फेसबुक लाईव्ह अन्.., महिलेनं सांगितला विचित्र अनुभव मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत हेगडे यांच्याकडे एक चार वर्षाची गाई आणि तिचं वासरू आहे. दिवाळीनंतर त्यांनी गायीची पुजा केली. यासाठी त्यांनी गाईला आणि वासराला अंघोळ घातली आणि फुलंही वाहिली. काही लोक गाईला लक्ष्मीचं रूप मानतात. त्यामुळे तिला महागड्या दागिन्यांनी सजवलं जातं. पुजेनंतर हे दागिने काढून घेतले जातात. श्रीकांत हेगडे यांच्या कुटुंबीयांनी वासराला 20 ग्रॅमची सोन्याची साखली घातली. मात्र ही साखळी काढून घेतल्यानंतर त्यांनी ती फुल आणि इतर साहित्यासोबत गाईच्या समोरच ठेवली. नंतर सोन्याची साखळी गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. भरपूर शोधूनही साखळी मिळाली नाही. यामुळे त्यांनी असा अंदाज लावला की गाईनेच तिथे ठेवलेल्या फुलांसोबत साखळी गिळली असावी.
Real-life ‘Gully Boy’; मुंबईतील रिक्षाचालकाच्या रॅपर मुलीचा युट्यूबवर कल्ला
यानंतर कुटुंबातील सदस्यांनी 30 ते 35 दिवस सलग गायीचं शेणं तपासलं. मात्र तरीही ही साखळी मिळाली नाही. अखेर मदतीसाठी ते पशुवैद्यकाकडे गेले. डॉक्टरांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने तपासणी केली आणि सांगितलं की गायीच्या पोटात धातू आहे. यानंतर पोटाचं स्कॅन करून हे शोधण्यात आलं की साखळी नेमकी कुठे अडकली आहे. कुटुंबीयांच्या विनंतीवरून शस्त्रक्रिया करून सोनसाखळी काढण्यात आली. या साखळीचे वजन 20 ग्रॅमवरुन घसरून 18 ग्रॅम झालं होतं. कारण त्यातील एक छोटासा भाग गायब आहे. मात्र त्यांची मौल्यवान साखळी मिळाल्याने कुटुंब आनंदी आहे. मात्र या सगळ्या वेदनांमधून गायीला जावं लागलं याची त्यांना खंतही आहे.