जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Real-life 'Gully Boy'; मुंबईतील रिक्षाचालकाच्या रॅपर मुलीचा युट्यूबवर कल्ला

Real-life 'Gully Boy'; मुंबईतील रिक्षाचालकाच्या रॅपर मुलीचा युट्यूबवर कल्ला

Real-life 'Gully Boy'; मुंबईतील रिक्षाचालकाच्या रॅपर मुलीचा युट्यूबवर कल्ला

तरीही तिच्याकडे अद्याप स्वतःचा स्मार्टफोन नाही, असं सांगितलं तर खरं वाटेल का? नाही ना! पण हे खरं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 13 डिसेंबर : एखाद्याचं यू-ट्यूब चॅनेल (YouTube Channel) आणि इन्स्टाग्राम पेज (Instagram Page) असणं यात अलीकडे फारसं काही नवीन राहिलेलं नाही. त्यात संबंधित व्यक्ती तरुण असेल, तर या दोनच नव्हे, तर आणखीही अनेक सोशल मीडियावर त्यांची पेजेस/अकाउंट्स असू शकतात; पण एका मुलीच्या यू-ट्यूब चॅनेलला तीन हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवरही तिला बरेच फॉलोअर्स आहेत; तरीही तिच्याकडे अद्याप स्वतःचा स्मार्टफोन नाही, असं सांगितलं तर खरं वाटेल का? नाही ना! पण हे खरं आहे. सानिया मिस्त्री असं या 15 वर्षांच्या मुलीचं नाव. ती 11वीत शिकते आणि मुंबईतल्या गोवंडी (Govandi Mumbai) परिसरात राहते. तिचे वडील ऑटोरिक्षाचालक (Auto Rikshaw Driver) आहेत. ती रॅपर (Rapper) आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून रॅपिंगची प्रॅक्टिस करते. Saniya MQ या नावाचं तिचं यू-ट्यूब चॅनेल असून, त्या चॅनेलला 3000हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही तिचे फॉलोअर्स आहेत. तिची रॅपिंगची कला हेच तिचं वेगळेपण आहे. मैत्रिणीच्या स्मार्टफोनच्या साह्याने ती व्हिडिओ तयार करून शेअर करते. तिचे काही व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सानियाने आपल्या कलेबद्दल आणि उपक्रमाबद्दल सांगितलं. ‘माझ्या कुटुंबातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्तींना रॅप म्हणजे काय हेच माहिती नाही. त्यामुळे हे काय आहे हे त्यांना सांगण्यापासून मला सुरुवात करावी लागली. रॅपिंग करणं करणं चांगलं असतं हे मी त्यांना सांगितलं. तसंच ते कसं करायचं हे त्यांना दाखवलं आणि मला ते खूप आवडत असल्याचंही त्यांना सांगितलं. नंतर माझ्या आईलाही ते आवडलं. मी घराबाहेर येऊन रॅपिंग करू लागले, तर जग काय म्हणेल, हा प्रश्नही माझ्यासमोर होता; मात्र आता मला माझे आई-वडील आणि शिक्षकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मी हे सुरू ठेवणार आहे,’ असं सानिया म्हणाली. हे ही वाचा- आता घरबसल्या करता येणार टॉप Courses; Online शिक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल

    जाहिरात

    यासाठी सहकार्य करणारी सानियाची जवळची मैत्रीण नसरीन अन्सारी म्हणाली, ‘जेव्हा सानिया पहिल्यांदा स्टेजवर रॅपिंग करण्यासाठी गेली, तेव्हा समोर असलेली गर्दी पाहून तिची आई घाबरली होती; पण जेव्हा सानियाने परफॉर्मन्स सुरू केला, तेव्हा मात्र तिने सर्वांना प्रभावित केलं आणि ते पाहून तिच्या आईलाही आनंद झाला.’ सानिया पहिल्यापासूनच क्रिएटिव्ह आहे. काही वर्षांपूर्वी तिला फ्रेंड सर्कलमधल्या कोणी तरी चॅलेंज दिलं. त्यामुळे तिने रॅपिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही, असंही नसरीनने सांगितलं. आपलं स्वप्न पूर्ण होण्यात भविष्यात किती अडचणी येऊ शकतात, याची सानियाला जाणीव आहे; पण ती जिद्दी आहे आणि तिने आपलं काम सुरू ठेवलं आहे. ‘होय, माझं स्वप्न खूप उच्च आहे; पण ईशकृपेने माझं स्वप्न साकार होईल, अशी आशा मला आहे,’ असं सानियाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात