नवी दिल्ली 07 डिसेंबर : सोशल मीडिया (Social Media) एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यात माणसांपासून प्राण्यांपर्यंतचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत असतात. मात्र सर्वात जास्त ज्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात यात कुत्रा, मांजर आणि माकड यांचा समावेश आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंतीही मिळते. या प्राण्यांच्या हालचाली आणि मस्ती पाहण्यासारखी असते. मात्र कधीकधी काही व्हिडिओ हैराण करणारेही असतात. जे पाहूनच लोकांना दया येते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिवर चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांनी राग व्यक्त केला आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका कुत्र्याचा आणि शेळीचा (Goat and Dog Video) आहे. यात शेळी कुत्र्याची अवस्था वाईट करते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका घराबाहेरून जागेत शेळी उभा आहे. जवळच असलेल्या टेबलच्या खाली एक कुत्रा लपलेला आहे. अचानक कुत्र्याला पाहून शेळी भडकते आणि टेबलाखाली असलेल्या कुत्र्याला शिंगाने मारू लागते. कुत्रा टेबलखालून बाहेर निघून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो बाहेर येताच शेळी पुन्हा त्याला मारू लागते. अखेर कुत्रा आपला जीव वाचवून तिथून पळ काढतो.
View this post on Instagram
हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. व्हिडिओ पाहून लोक विचलित झाले आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ asupan.reels.hewani नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला 1 लाख 79 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 5 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, कोणीतरी या कुत्र्याची मदत करा. तर दुसऱ्याने हा व्हिडिओ भयंकर असल्याचं सांगितलं. तर काही यूजर्सनी ही मजेची बाब नसल्याचं म्हटलं आहे. शेळी कुत्र्याला वाईट पद्धतीने मारत असून ही हसण्यासारखी बाब नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Goat, Video Viral On Social Media