मराठी बातम्या /बातम्या /Viral /दिमाखात पाण्यात स्टंट करायला गेला अन्...; डोक्यावर पडून तरुणाची झाली अशी अवस्था, VIDEO

दिमाखात पाण्यात स्टंट करायला गेला अन्...; डोक्यावर पडून तरुणाची झाली अशी अवस्था, VIDEO

Stunt Video Viral : एका युवकाला स्टंट करणं चांगलंच भोवलं असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Stunt Video Viral : एका युवकाला स्टंट करणं चांगलंच भोवलं असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Stunt Video Viral : एका युवकाला स्टंट करणं चांगलंच भोवलं असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल

नवी दिल्ली 07 डिसेंबर : स्टंट करणं हे सर्वांनाच जमतं असं नाही. यासाठी भरपूर मेहनत आणि सराव करावा लागतो, तेव्हा कुठे परफेक्शन येतं. मात्र, अनेकदा लोक सराव न करताच निरनिराळे स्टंट करू लागतात. एक-दोनवेळा त्यांचा स्टंट यशस्वी होतोही मात्र प्रत्येकवेळी असं होत नाही. अशात त्यांचं चांगलंच नुकसान होतं. अनेकदा तर स्टंटच्या नादात लोकांना गंभीर दुखापतही होते. यानंतर त्यांना उठणं-बसणंही अवघड होऊन जातं. सध्या एक असाच स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Stunt Video Viral on Social Media) होत आहे.

यात एका युवकाला स्टंट करणं चांगलंच भोवलं असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक युवक दुरून धावत येतो आणि स्टंट करत हवेत उडून पाण्यात उडी घेतो. मात्र कदाचित त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती की ज्याठिकाणी तो उडी घेत आहे, तिथे पाणी कमी आहे. पाणी इतकं कमी असतं जे कदाचित त्याच्या गुडघ्यांपर्यंतही पोहोचत नाही.

हा बिचारा तरुण पाण्यात उडी घेतो मात्र पाणी कमी असल्याने डोक्यावर खाली आदळतो आणि यानंतर त्याला जाणीव होते की इथे पाणी कमी आहे. मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो आणि या स्टंटमुळे त्याला चांगलाच मारही लागलेला असतो. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे.

खरंतर या युवकाने घेतलेली उडीही तितकी परफेक्ट नसते, जितकी ती असायला हवी. याच कारणामुळे त्याचा स्टंट फेल होतो आणि तो डोक्यावर पडतो. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ surendra_suru नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 26 मिलियन म्हणजेच 2.6 कोटीहून अधिकांनी पाहिला आहे. तर 13 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे.

व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, खूप जोरात लागलं असेल. तर आणखी एकाने लिहिलं 'सस्ता नशा'. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Shocking viral video, Stunt video