मराठी बातम्या /बातम्या /Viral /

5 पैशांचं नाणं देऊन फ्रीमध्ये बिर्याणी खाण्याची दिली ऑफर, पण मालकाचा अंदाज चुकला आणि...

5 पैशांचं नाणं देऊन फ्रीमध्ये बिर्याणी खाण्याची दिली ऑफर, पण मालकाचा अंदाज चुकला आणि...

ज्याच्याकडे पाच पैशांचं नाणं असेल, त्याला फ्री बिर्यानी दिली जाईल, अशी ऑफर बिर्यानी स्टॉल मालकाने ठेवली. कोणाकडेच हे नाणं नसेल, हाच विचार करुन त्याने या ऑफरची घोषणा केली खरी, पण त्याचं अंदाज पूर्णपणे उलट ठरला.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 जुलै: सध्याच्या काळात आता पाच पैशांत काही वस्तू, खायचा पदार्थ येईल याची कल्पना तरी करता येईल का? पाच पैसे आता चलनातच नसल्याने कोणाकडे हे नाणं देखील असेल का याची शक्यता तशी कमीच ठरते. हाच विचार करुन एका बिर्यानी स्टॉल मालकाने पाच पैसे नाण्यावरुनच ऑफर ठेवली. ज्याच्याकडे पाच पैशांचं नाणं असेल, त्याला फ्री बिर्यानी दिली जाईल, अशी ऑफर बिर्यानी स्टॉल मालकाने ठेवली. कोणाकडेच हे नाणं नसेल, हाच विचार करुन त्याने या ऑफरची घोषणा केली खरी, पण त्याचं अंदाज पूर्णपणे उलट ठरला. पाच पैशांचं नाणं घेऊन फ्री बिर्यानी खाण्यासाठी त्याच्या स्टॉलबाहेर भलीमोठी रांगच लागली.

हा संपूर्ण प्रकार तमिळनाडूच्या चेन्नईतील सेल्लूर भागातील आहे. एका व्यक्तीने सुकन्या बिर्यानी नावाने बिर्यानीचा नवा स्टॉल सुरू केला. आपल्या बिर्यानी स्टॉलचं प्रमोशन करण्यासाठी त्याने भन्नाट ऑफर ठेवली. पाच पैशांचं नाणं देणाऱ्याला बिर्यानी दिली जाईल, असं त्याने प्रमोशन करण्यासाठी सांगितलं. या ऑफरनंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली आणि बघता-बघता शेकडोंच्या संख्येने लोक पाच पैशांचं नाणं घेऊन फ्री बिर्यानी खाण्यासाठी स्टॉलबाहेर जमा झाले.

(वाचा - सायकलवरुन पार्सल डिलीव्हर करणाऱ्या Zomato बॉयला गिफ्ट केली बाईक, पाहा VIDEO)

300 हून अधिक लोकांची गर्दी झाली. पाच पैशांचं नाणं देऊन फ्रीमध्ये बिर्यानी खाण्यासाठी इतका गोंधळ झाला की थेट पोलिसांनाच बोलवावं लागलं. नागरिकांनी कोरोनाच्या मास्क, सोशल डिस्टन्सिंगच अशा कोणत्याही नियमांचं पालन न करता गर्दी जमा केली होती. गोंधळ इतका वाढला, की अखेर बिर्यानी स्टॉल मालकाला आपलं शटर बंद करावं लागलं. अनेकांनी पाच पैशांचं नाणं देऊनही बिर्यानी न मिळाल्याची तक्रारही केली आहे.

(वाचा - टीव्ही, फ्रीजपासून स्नॅक्सपर्यंत आहेत सर्व सोयी, या अफलातून Auto चा VIDEO पाहाच)

आपल्या नव्या बिर्यानी स्टॉलचं प्रमोशन व्हावं, अनेकांपर्यंत याची जाहिरात व्हावी या हेतूने बिर्यानी स्टॉल मालकाने भन्नाट ऑफर ठेवली खरी, पण ती इतकी भारी पडली की थेट स्टॉल काही वेळासाठी बंदच करावा लागला. कोणाकडे आताच्या काळात चलनात नसलेलं पाच पैशांचं नाण नसेल, असाच विचार करुन त्याने ही ऑफर ठेवली पण त्याचा अंदाज चुकला आणि मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं.

First published:

Tags: Chennai