नवी दिल्ली, 21 जुलै : जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना काहीतरी वेगळं, हटके करायचं असतं. अनेकदा हे लोक साध्या पण तितक्याच हटके गोष्टीतून सर्वाच्या चर्चेचा विषय ठरतात. मोठ्या मेहनतीतून ते आपली ओळख बनवतात. अशाच एका साध्या पण अतिशय हटके कल्पना अंमलात आणलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. आतापर्यंत आपण अनेक भारतीय ऑटो-रिक्षा पाहिल्या आहेत. अनेकांनी आपल्या रिक्षाला दिलेल्या भन्नाट स्वरुपाबाबतही विविध गोष्टी ऐकल्या असतील. पण चेन्नईतील एका ऑटो चालकाने आपल्या रिक्षाला दिलेलं रुप तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नसेल. चेन्नईतील (Chennai) अन्ना दुराई (Anna Durai) यांची ऑटो भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.
सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर अन्नाच्या ऑटोची मोठी (Anna Durai Auto) चर्चा आहे. चेन्नईत राहणाऱ्या रिक्षा चालक अन्ना दुराई यांच्यावर ऑफिशिअल ह्यूमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या अकाउंटने इन्स्टाग्रामवर रिल्स व्हिडीओ फीचर केला आहे. अन्नाच्या रिक्षात एखाद्या कॅफेमध्ये असाव्यात अशा सर्व बेसिक सुविधा आहेत.
कोरोना काळात अन्नाने आपल्या रिक्षामध्ये प्रवाशांसाठी मास्क आणि सॅनिटायजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्या रिक्षात मिनी फ्रीजही आहे. एवढंच नाही, तर टीव्ही, वाचायला वर्तमानपत्र, मॅग्झिन, आयपॅड, चार्जर, खायला स्नॅक्स अशा सर्व गोष्टी आहेत. आपल्या प्रवाशांना प्रवासाचा अधिकाधिक आनंद देणं, हाच यामागे उद्देश आहे. तसंच प्रवाशांना पेंमेंट करताना कोणत्या अडचणी येऊ नयेत, यासाठी कार्ड स्वॅपिंग मशीनही ठेवण्यात आली आहे.
View this post on Instagram
मोटिवेशनल स्पीकर -
अन्ना दुराई यांना लहानपणापासून मोठं व्यावसायिक व्हायचं होतं. परंतु त्यांच्या घरची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती की ते शिक्षण घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करू शकतील. म्हणूनच ते ऑटो ड्रायव्हर बनले. पणं त्यातही त्यांनी काहीतरी वेगळं, हटके करण्याचा प्रयत्न केला आणि या अफलातून ऑटो-रिक्षाची निर्मिती झाली. अन्ना एक मोटिवेशनल स्पीकरही आहेत. सात वेळा त्यांनी Tedx वर स्पीच दिलं आहे. त्यांना 9 भाषांची माहिती असून आपल्या प्रवाशांनाच ते देव मानतात. त्यांच्या या भन्नाट, हटके रिक्षाची तुफान चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Autorickshaw driver, Chennai