Home /News /viral /

सायकलवरुन पार्सल डिलीव्हर करणाऱ्या Zomato बॉयला गिफ्ट केली बाईक, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

सायकलवरुन पार्सल डिलीव्हर करणाऱ्या Zomato बॉयला गिफ्ट केली बाईक, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

एका सायकलवरुन झोमॅटो फूड डिलीव्हरी (Zomato Food Delivery) करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे.

  नवी दिल्ली, 21 जुलै : तुमची लहानही कृतीही एखाद्याला अतिशय मोठा आनंद देऊ शकते. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन फूड डिलीव्हरी (Online Food Delivery) हे सिस्टम सुरू झाल्यापासून अनेक लोक या माध्यमातून लहान-मोठी कमाई करत आहेत. बाईक किंवा सायकलवरुन अनेक जण घरोघरी फूड पार्सल डिलीव्हर करण्याचं काम करतात. अशाच एका सायकलवरुन झोमॅटो फूड डिलीव्हरी (Zomato Food Delivery) करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. रस्त्यावर कार उभी असताना कारमध्ये बसलेला एक व्यक्ती एका झोमॅटो डिलीव्हरी बॉयला सायकलवरुन जाताना पाहतो. त्या मुलाला अशाप्रकारे सायकलवरुन डिलीव्हरी करताना पाहून त्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला अतिशय वाईट वाटतं. ते सायकलवर असणाऱ्या त्या मुलाला जवळ बोलवतात आणि त्याला तु यापुढे सायकलवरुन अशाप्रकारे डिलीव्हरी करणार नाही असं त्याला सांगतात. कारमध्ये बसलेली व्यक्ती त्या मुलाला सांगते, की 'मी तुला 10 हजार रुपये देतो, तु आणखी काही पैसे टाकून बाईक घे किंवा रविवारी मला भेटायला ये. मी तुझी बाईकची सोय करतो.' त्यानंतर झोमॅटो डिलीव्हरी बॉय दुसऱ्या दिवशी त्या कारमधील व्यक्तीला भेटायला जातो. तो व्यक्ती त्या मुलाला सेकंड हँड पल्सर बाईक गिफ्ट म्हणून देतो. त्या व्यक्तीला मुलगा अशाप्रकारे सायकलवर घरोघरी पार्सल पोहोचवत असल्याचं पाहून वाईट वाटतं आणि ते त्याला सेकंड हँड बाईक देतात. त्यांनी केलेल्या या कृतीने, गिफ्ट केलेल्या बाईकमुळे मुलाच्या चेहऱ्यावर वेगळाचं आनंद दिसतो आहे. (वाचा - आनंद महिंद्रांना नाही रुचली Ferrari Ki Sawaari, गोल्ड कारच्या VIDEO वर केली टीका)
  हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत 6.6 लाख लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक युजर्सनी बाईक गिफ्ट करणाऱ्या व्यक्तीच्या या कृतीचं, त्यांनी दाखवलेल्या जाणीवेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Viral videos, Zomato

  पुढील बातम्या