मराठी बातम्या /बातम्या /Viral /एकाच बाईकवर 2 तरुणी करायला गेल्या खतरनाक स्टंट आणि...; धडकी भरवणारा VIDEO

एकाच बाईकवर 2 तरुणी करायला गेल्या खतरनाक स्टंट आणि...; धडकी भरवणारा VIDEO

तरुणी एका चाकावर हवेत बाईक उडवायला गेल्या आणि...

तरुणी एका चाकावर हवेत बाईक उडवायला गेल्या आणि...

तरुणी एका चाकावर हवेत बाईक उडवायला गेल्या आणि...

मुंबई, 15 डिसेंबर : हल्ली तरुणांप्रमाणे काही तरुणीही बाईक (Bike video) चालवताना दिसतात. आता बाईकचं हँडल हातात आलंच तर मग तरुणांप्रमाणे बाईकवर स्टंट (Girl's bike stunt video) दाखवण्यात तरी त्या कशा मागे राहतील. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात दोन तरुणींनी बाईकवर खतरनाक असा स्टंट केला (Bike accident video). त्यानंतर त्यांच्यासोबत जे घडलं ते पाहूनच धडकी भरते.

स्कूटीच्या तुलनेत बाईक खूप वजनदार असते. अशाच वजनदार बाईकवर या तरुणी स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांचा अपघात झाला. स्टंट करताना तरुणींनी विचारही केला नसेल की पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे. हा व्हिडीओ पाहूनच अक्षरशः धडकी भरते.

व्हिडीओत पाहू शकता दोन तरुणी स्पोर्ट्स बाईकवर आहेत. एक तरुणी बाईकच्या पुढे बसली आहे. तिच्या मागे असलेल्या तरुणीने बाईकचं हँडल आपल्या हातात धरलं आहे. बाईकच्या मागील सीटवर ती उभी आहे आणि बाईक एका चाकावर चालवताना दिसते. बाईक ती एका चाकावर हवेत उडवते आणि त्यानंतर तरुणीचं बाईकवरील नियंत्रण सुटतं आणि बाईकचा बॅलेन्स ढासळतो. दोघीही तरुणी बाईकवरून धाडकन रस्त्यावर कोसळता. दोघीही बाईकसह एकमेकांवर पडतात

हे वाचा - OMG! बोट लावताच मृत झाला साप; VIDEO पाहून नेटिझन्स हैराण

nature_beautiful007 इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी या तरुणींना पापा की परी म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी या तरुणींना आणि इतरांना असे खतरनाक स्टंट करू नका, असं आवाहन केलं आहे.

बाईक स्टंट करणाऱ्या तरुणीला अटक

काही महिन्यांपूर्वीच बाईक स्टंट करणाऱ्या एका तरुणीला अटक करण्यात आली होती. या तरुणीने बाइक स्टंट (Bike Stunt Video) करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.  हा व्हिडीओ व्हायरल होताच डीवरील नंबरवरून पोलिसांनी या तरुणीचा शोध सुरू केला.

या तरुणीचं नाव संजना असल्याची माहिती समोर आली. जना बारडोलीमधून सूरतमधये केवळ बाइक चालवण्यासाठी आली होती. त्या गाडीचं रजिस्ट्रेशन बिलाल घांची नावाच्या व्यक्तीच्या नावे होतं. त्याने संजनाला बाइक चालवण्यासाठी दिली होती.

हे वाचा - Goal yeee! शिंगांनी उडवला फुटबॉल, जिंकताच हरणाचं भन्नाट सेलिब्रेशन; पाहा VIDEO

जीव धोक्यात घालून ती भरधाव वेगान बाईक चालवत होती. या तरुणीचे आणखी देखील काही व्हिडीओ आधी व्हायरल झाले आहेत. बाइक स्टंट करत व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणं मात्र तिला महाग पडलं. बाइक चालवणं एक वेगळी गोष्ट आहे, पण कोणतीही खबरदारी न घेता स्टंट करणं चुकीचं असल्याच्या प्रतिक्रिया यानंतर उमटल्या. स्टंट करण्याव्यतिरिक्त कोरोना संबंधित नियमांचं पालन न केल्यामुळे देखील पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केली होती.  पण पोलिसांनी गैरसमजातून आपल्याला अटक केल्याचं तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं. त्यानंतर तिची सुटका झाली.

First published:

Tags: Accident, Bike accident, Bike riding, Shocking viral video, Stunt video, Viral, Viral videos, Woman biker