Home /News /viral /

Goal yeee! शिंगांनी फुटबॉल उडवत केला गोल, जिंकताच हरणाने केलं भन्नाट सेलिब्रेशन; पाहा VIDEO

Goal yeee! शिंगांनी फुटबॉल उडवत केला गोल, जिंकताच हरणाने केलं भन्नाट सेलिब्रेशन; पाहा VIDEO

फुटबॉल खेळणाऱ्या हरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 14 डिसेंबर : आपल्याला आनंद झाला, यश मिळालं की तो साजरा करण्याची आपली एक पद्धत असते. पण कधी कोणत्या प्राण्यांना (Animal video) असा आनंद साजरा करताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हरिण (Deer video) शिंगासह फुटबॉल खेळताना (Deer playing football) दिसत आहे. फक्त तो फुटबॉल खेळत नाही तर अगदी गोल करतो आणि त्यानंतर सेलिब्रेशनही करताना दिसतो (Deer football goal). एका पार्कमध्ये हे हरिण एकटंच फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ@MorissaSchwartz ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. फुटबॉल म्हणजे जो पायांनी खेळला जातो. पण हे हरिण आपल्या शिंगांनी फुटबॉल खेळतं शिंगांच्या मदतीने हरिण फुटबॉल गोलपोस्ट पर्यंत घेऊन जातो आणि गोल करतो. हा गोल झाल्यानंतर उड्या मारत त्याचं सेलिब्रेशनही हरिण करताना दिसत आहे. हरणाचं खेळणं, त्याचं जिंकणं आणि त्याने आनंद व्यक्त करणं हे पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. अगदी माणसांप्रमाणे उड्या मारून तो आपला आनंद व्यक्त करताना दिसतो आहे. लोकांना हरिणाची ही सेलिब्रेशन स्टाईल भयंकर आवडली आहे. फुटबॉल खेळल्यानंतर हरिण पुन्हा जंगलात जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना गोल इतकंच कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.  हा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला आहे. हे वाचा - VIDEO - भररस्त्यात रंगली शेळी-कुत्र्याची फाईट; लढाईचा शेवट पाहून हसू आवरणार नाही याआधी फुटबॉल खेळणाऱ्या दोन ह्ततांचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांची स्टाइल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. व्हिडीओमध्ये पाहू शकता दोन्ही हत्ती लहान आहेत. जेव्हा तो मैदानात फुटबॉल खेळायला उतरला तेव्हा त्याने एकमेकांकडून फुटबॉल हिसकावून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. दुसरा हत्ती आपल्या सोंडेत फुटबॉल लपवून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. हे वाचा - शेवटच्या घटका मोजत होतं माकड; व्यक्तीने तोंडाने श्वास देत घडवला चमत्कार, VIDEO IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूप आवडला होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या