Home /News /viral /

OMG! बोट लावताच मृत झाला साप; VIDEO पाहून नेटिझन्स हैराण

OMG! बोट लावताच मृत झाला साप; VIDEO पाहून नेटिझन्स हैराण

सापाचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत.

  मुंबई, 14 डिसेंबर : सापाला (Snake video) नियंत्रणात करणं सोपं काम नाही.  सापाला पकडण्याचं प्रशिक्षण घेतलेले स्नेक कॅचर्सचीही सापांना पकडताना तारांबळ उडते. पण सध्या एका अशा सापाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो फक्त एका बोटानेच गार झाला. त्या सापाला बोट लावलं आणि जमिनीवर आडवाच झाला (Snake acting video) . व्हिडीओत पाहू शकता जमिनीवर एक साप आहे. त्याने आपलं तोंड वर केलं आहे. एक व्यक्ती त्या सापाच्या जवळ येते आणि हळूच त्या सापाला स्पर्श करते. ही व्यक्ती फक्त आपलं एक बोट त्या सापाला लावते आणि साप धाडकन जमिनीवर कोसळतो. जणू काही तो मृतच झाला असं वाटतो.
  View this post on Instagram

  A post shared by ViralHog (@viralhog)

  व्हिडीओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटलं. एका बोटात साप कसं काय मरेल. तर बरोबर असं प्रत्यक्षात शक्यच नाही. खरंतर हा साप नाटक करतो आहे. जसं व्यक्ती त्याला स्पर्श करते तसा तो जमिनीवर कोसळून मृत झाल्याचं नाटक करतो. हा ड्रामेबाज साप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हे वाचा - Goal yeee! शिंगांनी उडवला फुटबॉल, जिंकताच हरणाचं भन्नाट सेलिब्रेशन; पाहा VIDEO व्हायरल हॉग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सापाचं हे असं रूप लोकांना खूप आ़वडलं आहे. तर काही युझर्सनी सापाला हात लावणाऱ्या व्यक्तीबाबतही चिंता व्यक्त केली. जर साप त्याला चावला असता तर चांगलंच महागात पडलं असं त्यांनी म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या