एका तरुणाने डेटिंग करत असलेल्या तरुणीसोबत एक रात्र घालवली. त्यानंतर तिच्या ब्रामुळे तिचं मोठं सिक्रेट त्याला समजलं.
क्रिस असं या तरुणाचं नाव. ज्याने बऱ्याच कालावधीआधी सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट करत आपला हा किस्सा सांगितला होता.
क्रिस म्हणाला, ती तरुणी तिची ब्रा त्याच्या घरी विसरून गेली आणि दुसऱ्या दिवशी तिने त्याला एक मेसेज केला.
मेसेजमध्ये ती म्हणाली, मी त्याच्या घरी माझी ब्रा ठेवली आहे. आता हे सांगण्यासाठी त्याला मला कॉल करण्याशिवाय पर्याय नाही. मला वाटतं मी प्रेमात पडले आहे. तुझी रात्र कशी होती.
महिलेचा हा मेसेज पाहून क्रिस हैराण झाला पण ती महिला आपल्यावर प्रेम करते हे समजताच त्याच्या आनंदालाही पारावर उरला नाही.
त्यानेही त्या महिलेच्या मेसेजला रिप्लाय दिला. माझी रात्र खूप चांगली होती कराण मी ती तुझ्यासोबत घालवली. मला वाटतं तसा हा मेसेज माझ्यासाठी नसावा.
क्रिसने रिप्लाय देतात महिलेने लगेच मेसेज केला. अरे देवा. माझ्या या मेसेजकडे लक्ष देऊ नको. मला आता खूप लाज वाटते आहे.
क्रिसच्या मते महिलेने त्याला चुकून मेसेज पाठवला ज्यामुळे तिची पोलखोल झाली. ती आपल्यावर प्रेम करत असल्याचं तिचं सिक्रेट त्याला समजलं.
द मिररच्या रिपोर्टनुसार नेटिझन्सने तिने मुद्दामहून ब्रा त्याच्या घरी ठेवल्याचं म्हटलं आहे. तिने चुकून नव्हे तर मुद्दामहून मेसेज केला होता. जेणेकरून ती क्रिसवर प्रेम करते हे त्याला समजावं. ही नियोजित चूक होती, असं इतर लोकांचं म्हणणं आहे. (सर्व फोटो सौजन्य - Canva)