नवी दिल्ली 17 जानेवारी : प्रेम (Love) हे एक असं नातं समजलं जातं, ज्यात लोक एकमेकांसोबत जो़डले जातात. दोघं एकमेकांच्या सुख-दुःखातील साथीदार बनतात. मात्र, अनेकदा यात तिसऱ्याची एन्ट्री झाल्याची प्रकरणंही पाहायला मिळतात. यानंतर बहुतेक नाती तुटतात. मात्र, नुकतंच एका महिलेनं सोशल मीडियावर (Social Media) खुलासा केला की प्रियकर आणि आपल्यामध्ये तिसऱ्या महिलेची एन्ट्री झाल्याने त्यांचं नातं तुटण्यापासून वाचलं आहे.
प्रेमाची ही शॉकींग स्टोरी (Shocking Love Story) ऐकून लोकही हैराण झाले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या चॅनेल बी हिने आपली ही स्टोरी शेअर केली आहे. तिने सांगितलं, की कशाप्रकारे आपल्या आणि आपल्या प्रियकराच्या मध्ये तिसरी महिला आल्यामुळे त्यांचं नातं तुटण्यापासून वाचलं. महिला 24 तासात तीन जॉब करते. यामुळे घरी परतल्यानंतर आपल्या प्रियकरासोबत रोमान्स (Romance With Boyfriend) करण्याचा वेळ आणि इच्छा दोन्ही राहिलेली नसते. यामुळे आता तिने आपल्या प्रियकरासाठी स्वतःच दुसरी मुलगी शोधली आहे.
महिलेनं खुलासा केला की कामात व्यग्र असल्याने ती आपल्या प्रियकराला जास्त वेळ देऊ शकत नाही. यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. चॅनेलने अनेक थेरेपींचाही आधार घेतला मात्र तरीही आता आपल्यातलं नातं तुटू शकतं, असं तिला जाणवू लागलं. अखेर आपलं नातं वाचवण्यासाठी तिने असं पाऊल उचललं, त्याबद्दल ऐकूनच सगळे हैराण झाले. 28 वर्षीय चॅनेल आपल्या प्रियकरासाठी एक दुसरी तरुणी घेऊन आली. आता ही तरुणी चॅनेलच्या जागी तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करते.
आपली स्टोरी शेअर करत चॅनेलने म्हटलं की या निर्णयामुळे तिचं आणि तिच्या प्रियकराचं नातं वाचलं. तिनं सांगितलं, की पैसे कमवण्यासाठी ती खूप काम करते. मात्र कामावरुन परतल्यानंतर तिची इतकी चिडचिड होते, की प्रियकराने हात लावला तरीही ती रागवते. यासाठी तिने आपल्या प्रियकरासाठी दुसरी तरुणी शोधली. आता या निर्णयानंतर तिचा प्रियकरही खुश राहातो आणि त्यांचं नातंही तुटण्यापासून वाचलं.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.