Home /News /viral /

येथे होते Girlfriend ची Loyalty Test, स्वतः Boyfriend मोजतो हजारोंनं पैसे

येथे होते Girlfriend ची Loyalty Test, स्वतः Boyfriend मोजतो हजारोंनं पैसे

love triangle

love triangle

अमेरिकामध्ये अलाबामा (Alabama, America) येथे राहणारा 20 वर्षीय तरुण अजब व्यवसाय करतो. तो दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंडसोबत फ्लर्ट करतो आणि पैसे मिळवतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हो.

  नवी दिल्ली, 16 जानेवारी: मानवी संस्कृती आणि कलेचा प्रेम हा अविभाज्य घटक बनला आहे. प्रेम ही एक वेगळीच परिभाषा आहे. प्रेमात विश्वास ही गोष्ट महत्त्वाची भूमिका बजावत असते. जोडीदाराशी एकनिष्ठ असण हे खूप महत्त्वाचे ठरते. पण असे असले तरी काही ना काही संशयीत गोष्टी या घडत असतात. आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आपल्याशी कितपत एकनिष्ठ आहेत यावरुन मनात संशयकल्लोळ माजलेला असतो. त्यामुळे अनेकदा वादविवाद घडतात. या गोष्टींचा अडथळा येऊ नये म्हणून अमेरिकेतील तरुणांनी भलतीच शक्कल लढवली आहे. अमेरिकामध्ये अलाबामा (Alabama, America) येथे राहणारा 20 वर्षीय तरुण अजब व्यवसाय करतो. तो दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंडसोबत फ्लर्ट करतो आणि पैसे मिळवतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हो. यामागचे कारणही तसेच आहे. जेवियर लॉन्ग (Xavier Long) असे या तरुणाचे नाव आहे. जेवियर हा दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत फ्लर्टिंग करण्याचा व्यवसाय (American Man Flirts with unknown women) करतो. आता हे कसलं काम असे म्हणाल. जेवियर हा एक प्रकारचा व्यावसायिक गुप्तहेर आहे जो इतरांच्या गर्लफ्रेंडची प्रामाणिकता तपासण्यासाचे काम करतो. आणि आपल्या गर्लफ्रेंडची प्रामाणिकता (Man gets Paid to do loyalty test on girlfriends) त्यांचे बॉयफ्रेंड जेवियरला पैसे देतात.

  इथे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची लॉयल्टी टेस्ट करण्यासाठी खर्च करतात इतके रुपये

  जेवियरने याबद्दल माहिती देताना म्हणाला, अनेक तरुण आहेत ज्यांना रिलेशनशिपमध्ये असुरक्षितता वाटते. त्यांना वाटते की आपली गर्लफ्रेंड आपल्याला धोका देईल. त्यांची लॉयल्टी टेस्ट करण्यासाठी जेवियरला कामाला लावतात. त्यानंतर जेवियर त्या तरुणींना सोशल मीडियावरुन मेसेज करतो आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. जर त्याला त्या तरुणी त्याच्याकडे आकर्षित होत आहेत किंवा त्यांचे दुसरीकडे असलेले नाते लपवण्याचा प्रयत्न केला याची जाणील झाली की त्याची माहिती जेवियर बॉयफ्रेंडला देतो.

  1 महिन्यात 1 लाख होते कमाई

  विशेष गोष्ट म्हणजे या व्यवसायामध्ये जेवियर एका महिन्या एका लाखाची कमाई करतो. जेवियर म्हणाला, खुप कमी वेळेत माझ्या व्यवसायात यश मिळाले आहे. आता तो त्याच्या फीमधून एका आठवड्यात 1 लाख रुपयांहून अधिक कमावतो. जेवियरने सांगितले की तो खरी रक्कम सांगू शकत नाही, परंतु त्याने या व्यवसायातून खूप कमावले आहे जेवियरने हे काम पहिल्यांदा मोफत सुरू केले होते त्याच्या एका टिकटॉक फॉलोअरच्या विनंतीवरून ज्याने त्याला मेसेज करून गर्लफ्रेंडची एकनिष्ठा तपसण्यासाठी सांगितले. जेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्याने ठरवले की आपण हाच व्यवसाय करायचा. यानंतर त्याचा डीएम बॉयफ्रेंडच्या मेसेजने भरला होता.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Viral, Viral news

  पुढील बातम्या