Home /News /viral /

बॉयफ्रेंडने काहीच न करता गर्लफ्रेंड झाली 'प्रेग्नेंट', नेमंक प्रकरण काय?

बॉयफ्रेंडने काहीच न करता गर्लफ्रेंड झाली 'प्रेग्नेंट', नेमंक प्रकरण काय?

काही माणसं आपल्या जोडीदाराचा विचार न करता सोडून जातात. समोरच्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल? याबाबत कोणताही विचार न करता ते निघून जातात.

    मुंबई, 16 जानेवारी : प्रेम ही संकल्पना आणि भावना खूप अद्भूत आहे. या भावनेचा आपण आदर करायलाच हवा. तसेच आपल्या जोडीदाराचा आदर करायलाच हवा. विशेषत: जोडीदारावर विश्वास ठेवायला हवा. तसेच जोडीदाराचा विश्वासघात होईल, असं कृत्य आपल्याकडून घडायला नको. अन्यथा या प्रेम प्रकरणाला विचित्र वळणं लागतं. नंतर हे प्रकरण अतिशय विकृत घटनेने थांबतं. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे एक घटना अशीच घडली आहे. याबाबत 'द सन' या वेबसाईटने माहिती दिली आहे. काही माणसं आपल्या जोडीदाराचा विचार न करता सोडून जातात. समोरच्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल? याबाबत कोणताही विचार न करता ते निघून जातात. पण आपल्या गर्लफ्रेंडला असं अर्ध्या वाटेतून सोडून जाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्याच्या गर्लफ्रेंडने त्याचा बदला घेण्यासाठी भयानक शक्कल लढवली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही टिकटॉकर आहे. तिला तिच्या प्रियकराने धोका दिला होता. त्याने तिला सोडून दुसऱ्याच मुलीचा हात धरला होता. त्यामुळे रागावलेल्या प्रेयसीने त्याच्या या कृत्याचा बदला घेण्याचं ठरवलं. पण त्यासाठी तिने निवडलेला रस्ता अतिशय विचित्र होता. तिने निवडलेल्या या रस्त्याविषयी जेव्हा लोकांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. महिलेने आपल्या या कृत्याबाबत व्हिडीओ जारी करत खुलासा केला आहे. (महिला ऑनलाईन लघवी विकून कमवते बक्कळ पैसा, एक कप युरीनची किंमत तब्बल...) महिला व्हिडीओत नेमकं काय म्हणाली? "मला सहा महिन्यांपूर्वी माहिती पडलं की, माझ्या प्रियकराने दुसऱ्या कुठल्या मुलीसाठी मला धोका दिला, माझा विश्वासघात केला. मला ही गोष्ट माहित पडली तेव्हा मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं. पण ही घटना मला आतून सलत होती. खूप वाईट वाटत होतं. त्यामुळे मी प्रियकाराकडून याचा बदला घेण्याचं ठरवलं. मी गरोदर असल्याचं नाटक केलं. मी स्वेटरच्या आतमध्ये पोटाजवळ भरपूर कपडे टाकले आणि त्याचा फोटो काढून प्रियकराला पाठवले. ते पाहुन बॉयफ्रेंडला मोठा धक्का बसला", असं महिलेने व्हिडीओत म्हटलं. महिलेने टिकटॉकवर या प्रँकबद्दल लोकांना सांगितलं आहे. विशेष म्हणजे महिलेने लोकांसमोर आपल्या स्वेटरच्या आतमधून कपडे बाहेर काढले. तसेच आपला बॉयफ्रेंड आपल्यासोबत असं वागू शकतो तर त्याचा बदला घ्यायलाच हवा, असं महिला म्हणते. महिलेच्या व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया महिलेच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवली. काही महिलांनी तिला पाठींबा दर्शवला. अशाप्रकारे धोका देणाऱ्या प्रियकराला अशीच अद्दल घडवायला हवी, अशी भूमिका काही जणांनी मांडली. धोका देणाऱ्या बॉयफ्रेंडला शिक्षा व्हायलाच हवी, असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींनी या व्हिडीओवरुन महिलेवर निशाणा साधला. मुलाने चुकीचं वागलं तर मुलीनेही चुकीचं वागू नये, असं एका युजरने म्हटलं. तर एकाने ही आयडीया अतिशय चुकीची असून असं कुणासोबतही करु नये, असं म्हटलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या