मराठी बातम्या /बातम्या /Viral /आंधळं प्रेम! बॉयफ्रेंडचा जीव वाचवण्यासाठी दान केली किडनी; 10 महिन्यातच तरुणीला मिळाला धोका

आंधळं प्रेम! बॉयफ्रेंडचा जीव वाचवण्यासाठी दान केली किडनी; 10 महिन्यातच तरुणीला मिळाला धोका

कॉलीन आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या डोळ्यादेखत मरताना पाहू शकत नव्हती. यामुळे काहीही विचार न करता तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला

कॉलीन आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या डोळ्यादेखत मरताना पाहू शकत नव्हती. यामुळे काहीही विचार न करता तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला

कॉलीन आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या डोळ्यादेखत मरताना पाहू शकत नव्हती. यामुळे काहीही विचार न करता तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली 24 जानेवारी : प्रेमात माणूस आपल्या पार्टनरसाठी काहीही करू शकतो. माणूस समोरच्या व्यक्तीसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतो. मात्र, रिलेशनशिपमध्ये दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल तितकंच प्रेम असेल, असं अजिबातही नाही. नुकतंच याचा पुरावा एका महिलेनं दिला. तिने आपल्या पार्टनरबाबतची हैराण करणारी घटना शेअर केला. महिलेनं सांगितलं, की तिने आपल्या बॉयफ्रेंडचा जीव वाचण्यासाठी त्याला आपली किडनी दान केली होती (Woman Donate Kidney to Boyfriend). मात्र, यानंतरही या व्यक्तीने तिला धोका दिला (Cheating in Love).

मृत्यूचा Live Video; चालत्या बाईकवर सोडला जीव; रात्रभर रस्त्यावरच पडून राहिला

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, टिकटॉकर कॉलीन (Colleen) हिने नुकतंच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यात तिने एक धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. कॉलीनने सांगितलं की 6 वर्षांपूर्वी ती एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती, मात्र त्याला वयाच्या 17 व्या वर्षापासूनच किडनीसंबंधी गंभीर समस्या होती. यामुळे त्याला डायलिसिसच्या प्रक्रियेतून जावं लागत होतं. त्याची किडनी केवळ 5 टक्के काम करत होती.

कॉलीन आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या डोळ्यादेखत मरताना पाहू शकत नव्हती. यामुळे काहीही विचार न करता तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. तिने आपली ब्लड टेस्ट केली. दोघांचं ब्लड मॅच झालं आणि किडनी ऑपरेशनही (Kidney transplant) यशस्वी झालं. इतकी मोठी मदत केल्यानंतर सहसा कोणीही माणूस समोरच्याचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मात्र, तिच्या बॉयफ्रेंडने याच्या उलट केलं. काही महिन्यांनंतर त्याने काहीच महिन्यात कॉलीनला धोका दिला.

थेट कारच्या आरपार शिरला भलामोठा लोखंडी खांब; भीषण अपघाताचा Shocking Video

बॉयफ्रेंडने तरुणीला म्हटलं की तो मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बाहेर जात आहे. मात्र, तिथून परतल्यानंतर त्याने मान्य केलं की त्याने कॉलीनला धोका दिला आहे आणि त्याचं दुसऱ्याच महिलेसोबत अफेअर आहे. या घटनेनंतरही कॉलीनने बॉयफ्रेंडला दुसरी संधी दिली. मात्र, तरीही यानंतर तीन महिन्यातच बॉयफ्रेंडने कॉलीनला फोन करून तिच्यासोबतचं नातं तोडलं. इतकंच नाही तर कॉलीनला त्याने म्हटलं, की तू मला किडनी फक्त यासाठी दिली, कारण तुला इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं होतं. आता कॉलीन यातून बाहेर निघाली आहे. मात्र, अशा रिलेशनमध्ये आपण अडकलेलो याचं तिला दुःख आहे.

First published:

Tags: Boyfriend, Kidney sell, Love story