जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फक्त एक KISS आणि Boyfriend चा खेळ खल्लास; Girlfriend ने शेअर केला Video

फक्त एक KISS आणि Boyfriend चा खेळ खल्लास; Girlfriend ने शेअर केला Video

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

एका किसमुळे गर्लफ्रेंडसमोर उलगडलं बॉयफ्रेंडचं मोठं गुपित.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 22 जानेवारी : आपल्या नवऱ्याचं किंवा बॉयफ्रेंड कुणा दुसऱ्या महिलेसोबत अफेअर तर नाही ना?, असा संशय काही महिलांना असतो. सामान्यपणे त्याच्या शर्टवर कुणा दुसऱ्या मुलीचा केस किंवा लिपस्टिक डाग दिसला की तो आपल्याला फसवतो आहे, याची खात्री होते. पण एका तरुणीने मात्र आपला बॉयफ्रेंड आपल्यासोबत चीटिंग करत आहे हे फक्त त्याच्या किसिंग स्टाईलवरूनच (Boyfriend kissing style changed) ओळखलं आहे. एका अमेरिकेन टिकटॉक युझरने (American TikTok user) आपला अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. @diybreakup या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे (Girlfriend caught cheater boyfriend by his kissing style). ज्यात तिने आपल्या चीटर बॉयफ्रेंडची कशी पोलखोल केली हे तिने सांगितलं. त्याच्या किंसिग करण्याच्या स्टाईलवरून तिने तो आपल्याला फसवत असल्याचं ओळखलं. हे वाचा -  वय वर्षे 35, दिसतोही धडधाकट; तरी हा लहान मुलांसारखं दररोज घालतो डायपर कारण… तिने सांगितलं, तिचा बॉयफ्रेंड एकदा घरी आला आणि त्याने तिला किस केला. तिला त्याचं किस वेगळं वाटलं. त्याची किस कऱण्याची स्टाईल बदलली होती. तिने याबाबत तिला विचारलं तेव्हा त्याने सारवासारव करत उत्तर दिलं. पण काही झालं तरी प्रेम किंवा किसिंग एका रात्रीत अशीबदलू शकत नाही ती तेव्हाच बदलू शकते, जेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असेल, त्या व्यक्तीला किस करते. त्याच्या आयुष्यात कुणीतरी दुसरी होती हे मला समजलं.

जाहिरात

महिलेने हा व्हिडीओ पोस्ट करताच काही नेटिझन्स तिच्याशी सहमत झाले आहेत. आपल्यालाही असाच अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं. हे वाचा -  लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येकवेळी मनात भीती निर्माण होत असेल तर काय करावं? या महिलेने तिचा असा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत आहे, हे कसं ओळखायचं याबाबत मार्गदर्शन केलं आहेत. तिने काही असे क्षण सांगितले आहेत, ज्यावरून तुम्ही हे पटकन ओळखू शकतात.

त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात, वागण्यात तुम्हाला असे काही बदल जाणवले तर सावध हा. हा तुमच्यासाठी एक अलार्म आहे. तुम्हा दोघात कुणा तिसऱ्याची एंट्री झाली आहे, हे समजून जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात