Home /News /lifestyle /

Sex Education | लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येकवेळी मनात भीती निर्माण होत असेल तर काय करावं?

Sex Education | लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येकवेळी मनात भीती निर्माण होत असेल तर काय करावं?

मनात भीती, चिंता, तणाव असेल तर त्याचा परिणाम लैंगिक संबंधांवरही होतो. यासाठी काय करावं हे जाणून घेणे फार महत्वाचं आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : शरीरसंबंधाची पहिलीच वेळ असेल तर मनात अनाहूत भिती निर्माण होणं साहजिक आहे. जोडीदारासोबत आपण अधिकाधिक चांगले शरीर संबध ठेऊ शकू का? जोडीदार समाधानी होईल की नाही, ही पण चिंता मनात येत असते. हे विचार अनेक लोकांच्या मनात येतात. मात्र, शरीर संबंधाच्या काळात असे विचार सारखेसारखे यायला लागले तर ते विकाराचे रूप घेतात. सेक्शुअल मेडिसीन रिव्ह्युमध्ये प्रकाशित शोध निबंधात असं नमूद करण्यात आलं आहे की 9 ते 25 टक्के लोकांना पुरुष स्तंभन दोष आणि शीघ्रपतन होण्याची चिंता असते तर 6 ते 16 टक्के महिलांना शरीर संबंध ठेवण्याची अनिच्छा बाधक ठरते. लैंगिक संबंध आणि चिंता यांच्यातील संबंध myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, तणाव आणि नैराश्य खूप वेळेपर्यंत शरीरसंबंध ठेवणं आणि शरीरसंबंधात तग धरून ठेवण्याच्या क्षमतेमध्ये बाधक ठरतात. तसंच सेक्शुअल मेडिसीन रिव्ह्युमध्ये प्रकाशित शोध निबंधानुसार, लैंगिक उत्तेजनाच्या काळात जर मनात चिंता आणि तणाव असेल तर ते शरीराच्या नर्व्ह सिस्टमवर परिणाम करतात. त्याने लैंगिक संबंध प्रभावित होतात. लैंगिक संबंध उत्तम करता यावे ही चिंता करणे ही वास्तवात एक मोठी समस्या आहे. जर या समस्येचं निवारण झालं तर लैंगिक जीवन अधिक स्वस्थ आणि आनंददायी होऊ शकतं. यासाठीच काही सूचना इथे दिल्या गेल्या आहेत. शारीरिक तपासणी करा शारीरिक संबंध ठेवताना शरीरात रक्त प्रवाहावर परिणाम होत असतो. अशात जर कुणी मधुमेह, संधिवात, अँडोमेट्रियोसिसचा रुग्ण असेल तर ते लवकर तणावात येतात. म्हणून आपली शारीरिक तपासणी करून घ्यायला हवी. जर योग्य कारणांची माहिती मिळाली तर शरीरसंबंध ठेवताना कुठलीही अडचण येत नाही. आपल्या शरीराला समजून घ्या साधारणपणे शरीरसंबंध करताना अनेकांना न्यूनगंडता वाटते. शरीर लठ्ठ किंवा दुबळं असेल तर मनात कमीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे शरीर संबंध ठेवताना शरीर जसं आहे तसं स्वीकार करणं शिकायला हवं त्याबाबत कमीपणा वाटून घेऊ नये. प्रेमात का मिळतो धोका? शास्त्रज्ञांनी 12 मुद्द्यांमध्ये सांगितली प्रेमाची कहाणी लैंगिक संबंधांविषयी शिक्षित व्हा लैंगिक शिक्षणाची कमतरता हेदेखील एक मुख्य कारण असू शकतं. याबाबत डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करा. शरीर संबंध योग्य होत आहेत पण अज्ञानामुळे तुम्हाला ते योग्य वाटत नाहीत आणि तुम्हाला चिंता वाटते, असंही असू शकतं. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल म्हणाल्या, लैंगिक आजारांची म्हणजेच एसटीडीची माहिती असणंही तितकंच गरजेचे आहे. म्हणजेच असुरक्षित शरीर संबंध ठेवल्याने कोणते आजार होऊ शकतात हेदेखील माहिती हवं. जोडीदारासोबत योग्य संवाद ठेवा शारीरिक संबंध करण्याअगोदर आपल्या जोडीदारासोबत छान बोला. लैंगिक संबंधांविषयी मनात किंतु ठेवू नका. आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंधाविषयी असलेले तुमचे विचार सांगा. जोडीदारालाही कुठलीही लाज वाटणार नाही असं पाहा. आपल्या जोडीदाराच्या काय अपेक्षा आहेत त्याही जाणून घ्या. मन शांत ठेवण्यासाठी हे उपाय करा शरीरसंबंधाची चिंता मनात असेल तर मन शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाची मदत घ्या. आहारावर लक्ष द्या, जास्त चरबी असलेला आहार घेऊ नका. त्याने शरीरातील फॅट वाढतात आणि स्नायूंमधील लवचिकता नष्ट होते. त्याने शरीरसंबंधावर प्रभाव पडतो. न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्यासाठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sex education, Sexual health

    पुढील बातम्या