मुंबई 07 जानेवारी : प्रेम ही खरं तर सहजसुलभ भावना आहे. आजकाल लोक प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. प्रेमासाठी विरोध, मरण पत्करण्याचीदेखील लोकांची तयारी असते. अगदी अशाप्रकारच्या घटनांविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रियकराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या विवाहसोहळ्याच्या ठिकाणी स्त्री वेषात दाखल झाला. पण ही गोष्ट जेव्हा प्रेयसीच्या कुटुंबियांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी त्याची यथेच्छ धुलाई केली असं या व्हिडिओत दिसत आहे. हा प्रसंग या व्यक्तीच्या आयुष्यभर लक्षात राहील असाच आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्सने कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहताना लोकांची हसून पुरेवाट होत आहे. लोकं प्रेमासाठी काय करत नाहीत. काही लढतात, काही मृत्यू पत्करतात किंवा शक्य होतील ते सर्व प्रयत्न करतात. पण काही वेळा प्रेमात वेडे झालेले लोक असं काही करतात की सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा होते. उत्तर प्रदेशातील एका प्रियकराने असा काही कारनामा केला की त्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आलाच; पण त्यासोबत त्याला मारदेखील खावा लागला. तुम्ही अनेकदा प्रेमात वेडे झालेले लोक पाहिले असतील, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट संबंधित व्यक्तीसाठी अडचणीचे कारण ठरते. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यामधील एका प्रियकराने असं पाऊल उचललं की त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर लक्षात राहतील. एकीकडे त्याची स्टाइल अन्य प्रेमींसाठी एक उदाहरण ठरली आहे तर दुसरीकडे या प्रियकराचे कृत्य पाहून नेटिझन्सची हसून पुरेवाट लागली आहे. या प्रियकराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या चित्रपटांची आठवण येते. त्यात गोविंदा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी स्त्रीवेशात जात असे. पण प्रत्यक्ष आयुष्य आणि चित्रपटात खूप फरक असतो. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने जोरदार कमेंट्स केल्या असून, लोक या विचित्र प्रियकराच्या कृत्याचा आनंद घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाच्या गर्लफ्रेंडचा विवाह होणार होता. त्यामुळे तिला घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. ही गोष्ट तिच्या प्रियकराला समजली. त्याने स्त्रीवेश परिधान करून गर्लफ्रेंड भेटायला जाण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्याने सर्वप्रथम महिलांसारखी साडी नेसली. बांगड्या भरल्या आणि लांब केसांचा विग लावला. त्यानंतर त्याने महिलांप्रमाणे मेकअपदेखील केला. महिलांप्रमाणे पूर्ण मेकअप केल्यावर तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. पण त्याचं चालणं, वागणं पाहून तिच्या कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी त्याला पकडले. ही गोष्ट लक्षात येताच त्याने विवाहस्थळावरून पळ काढला. पण गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांनी पाठलाग करून त्याला पकडले. मुलीच्या कुटुंबियांनी पकडताच सर्वजण त्याचा व्हिडिओ शूट करू लागले. त्याचा चेहरा व्हिडिओत दिसावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. मात्र प्रियकर ओढणीने चेहरा झाकून घेत होता. तिथं उपस्थित लोकांनी त्याला दोन चार फटकेदेखील मारले. मात्र त्यानंतर हा प्रियकर कसातरी मित्रांच्या मदतीने तिथून पलायन करण्यात यशस्वी झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सच्या कमेंट्स पाऊस पडला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सला हसू आवरत नसल्याचे दिसून येते.