नवी दिल्ली, 08 जानेवारी : सोशल मीडिया वर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर, काही भावुक असतात. पण काही व्हिडीओ असे असतात की ते पाहूनच संताप होतो. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एका तरुणीने मेट्रोमध्ये असं काही केलं आहे की व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत. तिच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. दररोज गर्दीने खचाखच भरलेली ट्रेन किंवा मेट्रो रिकामी मिळाली की आपल्याला इतकं बरं वाटतं की कुठे बसू आणि कुठे नाही असं होतं. या तरुणीलाही अशीच रिकामी मेट्रो मिळाली. मेट्रोत कुणीच नाही हे पाहिल्यानंतर तिने नको ते केलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे, तिच्यावर टीका होते आहे. हे वाचा - अनोखी मैत्री, ट्रेनमध्ये थकलेले दोन प्रवासी करताएत विश्रांती VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तरुणी ज्या मेट्रोत आहे, त्यात तिच्या आजूबाजूला दुसरा कोणताच प्रवासी दिसत नाही आहे. त्यावेळी ती उत्साहात असं काही काही करते की तुम्ही विचारही केला नसेल. सुरुवातीला ती आपले दोन्ही हात मेट्रोच्या हँडलला धरते आणि झोके घेते. त्यानंतर सीटवर विचित्र पद्धतीने बसते. सीटवर उभं राहून डान्सही करते. मध्ये मध्ये ती आपल्याला कुणी पाहत तर नाही ना, हेसुद्धा पाहते.
अपर्णा देवयाल या तरुणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 25 डिसेंबरला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत मेट्रोच्या खिडकीच्या काचेत दुसरी तरुणी या तरुणीचा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसतं. ही तरुणी नेमकी कोणत्या मेट्रोत आहे माहिती नाही. पण बनावटीवरून ही दिल्ली मेट्रो असावी असं वाटतं आहे. हे वाचा - Shocking: रस्ते अपघाताचे 5 असे व्हिडीओ, जे पाहून तुम्हाला झोप लागणार नाही सार्वजनिक वाहनात असं काही तरी करणं अयोग्य असल्याचं नेटिझन्सनी म्हटलं आहे. कमेंटमध्ये तिच्याविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. ही सीट शारीरिकरित्या विकलांगासाठी आहे, मानसिकरित्या नाही. असं एका युझरने म्हटलं आहे. तर मेट्रो प्रशासनाने तिच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही एका युझरने केली आहे.
मेट्रो असो वा इतर कोणतं सार्वजनिक वाहन त्यात असं काही करणं कितपत योग्य आहे? यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.