मुंबई 19 जानेवारी : सोशल मीडिय हे असं प्लॅटफॉर्म आहे. जिथे दररोज असे काही व्हिडीओ पडत असतात जे आपलं मनोरंजन करतात. हे व्हिडीओ कधी आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. तर कधी आपल्याला खूप काही शिकवतात. सोशल मीडियावर आपल्याला लग्ना संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, तसेच या व्हिडीओमधील तरुणीवर तुम्हाला कीव येईल.
हा व्हिडीओ एका प्रेमी जोडप्याचा आहे. लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान हे दोघेही जोशमध्ये येत असा डान्स करतात की ज्यामुळे त्यांचं हस होतं.
हे ही पाहा : व्हायरल व्हिडीओमुळे जादूगराची पोलखोल, पाहा सामान्य माणसाला असं फसवतात जादूगर
खरंतर प्रियकर आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन डान्स करायला येतो तेव्हा एकदा त्याचा तोल जातो, ज्यामुळे ते दोघेही पडतात. पण हा प्रियकर एवढ्यावरच थांबत नाही तर तो पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन उठतो आणि पुन्हा एकदा पडतो. लोकांनी भरलेल्या का पार्टीत या दोघांनीही आपलं हस करुन घेतलंय. ज्यामुळे या दोघांचाही असा काही अपमान झाला की ते आता ही गोष्ट आयुष्याच कधही विसरु शकणार नाहीत.
View this post on Instagram
शिवाय दोन वेळा ही तरुण अशी काही पडते की तिला पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की या करुणीला किती वाईट पद्धतीने लागलं असावं,
हा व्हिडिओ अमृत ९६९६६ नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओला काही वेळातच हजारो लाईक्स मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. लोक त्याची चर्चा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy, Funny video, Social media trends, Top trending, Videos viral, Viral