जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्हायरल व्हिडीओमुळे जादूगराची पोलखोल, पाहा सामान्य माणसाला असं फसवतात जादूगर

व्हायरल व्हिडीओमुळे जादूगराची पोलखोल, पाहा सामान्य माणसाला असं फसवतात जादूगर

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

एखाद्या व्यक्तीला मध्यभागी कापून टाकणारी जादू कशी करतात? व्यक्तीने उघडले जादूगाराचे गुपित, पाहा व्हिडीओ

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 18 जानेवारी : लहान मुले असोत किंवा मग वृद्ध, प्रत्येकालाच जादूचे खेळ पाहायला आवडतात. आपल्याला बऱ्याचदा माहित असतं की ही सगळी हात चलाखी आहे. खरी जादूवैगरे काही प्रकार नाही. पण बऱ्याचदा जादूगर असे काही खेळ दाखवतात जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जादू ही फारच मनोरंजक आहे. म्हणून आपण हे पाहाताना त्यामध्ये रमून जातो. ज्यामुळे आपण बऱ्याचदा लॉजिकचा विचार करत नाही. पण बऱ्याचदा जादू करताना जादूगराचे काही प्लान फसले आहे. ज्यामुळे काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत. पण या अशा काही हातावर मोजता येणाऱ्या गोष्टी सोडल्यात तर खरंच जादूगर फारच चलाख असतात आणि त्यांच्या याच गोष्टीचे आपल्याला कौतुक करायलाच हवय. हे ही पाहा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक तुम्ही अनेकदा असा जादूचा व्हिडीओ पाहिला असेल, ज्यामध्ये जादूगर एका बॉक्समध्ये त्याच्या सहकाऱ्याला झोपवतो आणि मग त्याला मध्यभागी कापतो आणि नंतर तो बॉक्स ओपन करुन देखील आपल्याला दाखवतो. जेणे करुन पाहणाऱ्याला ही त्याच्यावर विश्वास बसतो. पण हे घडल्यानंतर जादूगर पुन्हा एकदा त्याच्या सहकाऱ्याला पूर्वीसारखा चालता फिरता करतो किंवा त्याचे शरीर जोडतो. जे पाहून आपल्याला नवल वाटतं. हे कसं शक्य आहे किंवा जादूगर हे कसं करत असावा असा प्रश्न अनेकांना पडतो. पण सोशल मीडियावर यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो या जादूगराची पोलखोल करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे क्लिअर होईल की जादूगर असं का आणि कसं करत असावा. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जादूगाराचा पर्दाफाश केला आणि सांगितले की जादू ही खरोखर डोळ्यांची युक्ती आहे, दुसरे काही नाही. @TechBurritoUno या ट्विटर अकाउंटवर द सन वेबसाइटचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो जादूगारांचा पर्दाफाश करत असल्याचे दिसते.

जाहिरात

या व्हिडीओत काय आहे? जादूगार एका तरुणाला एका पेटीत टाकून बंद करतो आणि नंतर त्याला मध्यभागी कापतो. हे पाहून मागे उभ्या असलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. जादूगार तो बॉक्स वेगळा करतो. पण तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येते आणि जादूगाराचे सत्य सर्वांसमोर आणते. ती व्यक्ती आधी पायाकडचा बॉक्स उघडतो आणि दाखवते की त्यात काहीही नाही. यानंतर, तो डोके असलेला बॉक्स उघडतो, ज्यामध्ये तुम्हा पाहू शकता की हा तरुण आपलं शरीर दुमडून त्या बॉक्समध्ये फिक्स झालेला आहे. आता हा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की जादूगर ही जादू कशी करतात.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडीओला 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की, जादूगार हे देव नसतात, ते सुद्धा माणसेच असतात आणि ते या युक्त्या वापरून आपला उदरनिर्वाह करतात, त्यामुळे त्यांच्या युक्त्या उघड करू नयेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात