मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: प्रियकरानं डोळ्यासमोरच बांधली दुसरीसोबत लग्नगाठ; बाबू-सोना म्हणत आक्रोश करत राहिली लिव्ह इन पार्टनर

VIDEO: प्रियकरानं डोळ्यासमोरच बांधली दुसरीसोबत लग्नगाठ; बाबू-सोना म्हणत आक्रोश करत राहिली लिव्ह इन पार्टनर

ही तरुणी वारंवार बाबू-सोना अशी हाक मारत आपल्या प्रियकराला (Lover) आवाज देत राहिली. तिनं आपल्या प्रियकराविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

ही तरुणी वारंवार बाबू-सोना अशी हाक मारत आपल्या प्रियकराला (Lover) आवाज देत राहिली. तिनं आपल्या प्रियकराविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

ही तरुणी वारंवार बाबू-सोना अशी हाक मारत आपल्या प्रियकराला (Lover) आवाज देत राहिली. तिनं आपल्या प्रियकराविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

नवी दिल्ली 09 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. मात्र, सध्या समोर आलेला एक व्हिडिओ तुम्हाला हैराण करण्यासोबतच भावुकही (Emotional Video) करेल. या घटनेत एका तरुणीनं आपल्या प्रियकराच्या लग्नसमारंभात (Marriage Function) पोहोचून एकच गोंधळ केला. हे सर्व पाहून मॅरेज गार्डनचं गेट बंद करण्यात आलं. ही तरुणी वारंवार बाबू-सोना अशी हाक मारत आपल्या प्रियकराला (Lover) आवाज देत राहिली. तर, बराच वेळ गेटला धक्का देत होती. मात्र, गार्ड आणि युवकाच्या कुटुंबीयांनी तिला तिथून बाजूला केलं. जवळपास अर्धा तास मॅरेज गार्डच्या बाहेर ही तरुणी आक्रोश करत होती. ही घटना होशंगाबाद शहरातील आहे.

नवरदेवाच्या स्वागताला आली खुद्द नवरी, आधी पुष्पहार घातला नंतर...; VIDEO VIRAL

या घटनेची माहिती मिळताच कोवताली ठाण्यातील महिला एसआय श्रद्धा राजपूत आणि पोलीस मॅरेज गार्डनजवळ पोहोचले. त्यांनी तरुणीला गाडीमध्ये बसवलं आणि या सर्वाचं कारण विचारलं. तरुणीनं सांगितलं, की तिचा प्रियकर आणि ती तीन वर्षांपासून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते (Live in Relationship). आता तिच्या प्रियकरानं तिला काहीही कल्पना न देता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं.

" isDesktop="true" id="576924" >

एसआयनं तरुणीला म्हटलं, की कारवाई करायची असेल तर तक्रार कर, मात्र तिनं कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यास नकार दिला. यानंतर ही तरुणी आपल्या ओळखीच्या एक युवकासोबत भोपाळला परत गेली. ही तरुणी कानपूरची रहिवासी आहे. ज्या तरुणाच्या लग्नात तिनं गोंधळ केला तो होशंगाबाद जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. दोघंही भोपाळमधील खासगी कंपनीत काम करतात.

VIDEO: ती तरुणी मध्यरात्री रस्त्यावर फक्त धावते, लाखोंना का आवडतो हा TV शो?

तरुणीचं असं म्हणणं होतं, की दोघंही तीन वर्षांपासून पती-पत्नीप्रमाणं एकत्र राहत होते. ती प्रियकराला विचारायची की तुझं दुसरं कोणासोबत लग्न होणार आहे का? यावेळी तो सोना, बाबू मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार नाही, असं उत्तर द्यायचा. मात्र, गुरुवारी त्यानं लपून दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, तरीही तरुणीनं प्रियकराविरोधात कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Love story, Marriage, Video viral