मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरदेवाच्या स्वागताला आली खुद्द नवरी, आधी पुष्पहार घातला नंतर...; VIDEO VIRAL

नवरदेवाच्या स्वागताला आली खुद्द नवरी, आधी पुष्पहार घातला नंतर...; VIDEO VIRAL

नवरदेव मांडवदारी आला आणि पळत येत वधूने...

नवरदेव मांडवदारी आला आणि पळत येत वधूने...

नवरदेव मांडवदारी आला आणि पळत येत वधूने...

मुंबई, 09 जुलै : आपलं लग्न (Wedding) असं व्हावं, तसं व्हावं. आपल्या लग्नात (Wedding video) हे असावं ते असावं... लग्नाबाबत प्रत्येकाने काहीतरी स्वप्नं रंगवलेली असतात. तसं तरुण-तरुणी दोघांसाठीही लग्नाचा (Wedding viral video) क्षण खास असतो पण तरुणींसाठी मात्र हा जास्त अनमोल असतो. त्यामुळे आपलं लग्न लक्षात राहण्यासारखंच असावं असा प्रयत्न असतो आणि मग त्यातून काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न असतो किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याच्यासोबत लग्न झालं तर मग असं हटके काहीतरी आपसूकच होऊन जातं. सध्या अशाच लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात चक्क वधूने (Bride video) वराचा स्वागत केलं आहे (Bride welcome groom) आणि तिथंच तिनं नवऱ्याकडून (Groom video) आपली इच्छा पूर्णही करून घेतली.

सामान्यपणे जेव्हा वरात येते. तेव्हा नवरीचे (Bride) आई-वडील आणि इतर नातेवाईक नवरदेव (Groom) आणि वरातीचं स्वागत करतात. पण या लग्नात चक्क नवरीच आपल्या नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी मांडवदारी पोहोचली.

व्हिडीओत पाहू शकता हातात पुष्पहार घेऊन नवरी मंडपाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली. जिथं नवरदेव वरातीसह उभा आहे. नवरीला पाहून नवरदेवालाही आनंद झाला.

हे वाचा - बायकोच्या बडबडीला वैतागलात? या व्यक्तीला सापडला तिची बोलती करणारा रिमोट

नवरीने तिच्या हातातील पुष्पहार नवऱ्याच्या गळ्यात टाकला आणि त्यानंतर त्याचं तोंड आपल्या दोन्ही हातात धरून आपल्या डोक्याकडे नेलं. तिनं नवऱ्याकडून न बोलता फक्त इशाऱ्यात काहीतरी मागितलं आणि नवरदेवालाही आपल्या नववधूची इच्छा समजली. नवरीने त्याचा चेहरा आपल्या डोक्याकडे नेताच नवरदेवानं तिच्या कपाळावर गोड किस केलं.

सर्वांसमोरच नवरा-नवरीचा हा क्युट रोमँटिक क्षण झाला. त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. तुम्हालाही हा क्षण पाहून आनंद झालाच असेल. तुम्हीसुद्धा तुमच्या लग्नाची स्वप्नं रंगवत असाल, लग्न करण्याच्या विचारात असाल किंवा लग्न ठरलं आहे आणि लग्नाच्या तयारीला लागला असाल तर आपल्याही लग्नात असं व्हायला हवं असंसुद्धा कदाचित तुम्हाला वाटलं असेल.

हे वाचा - दाजी-मेहुणीची जोडी असावी तर अशी; VIDEO पाहून युझर्स म्हणतायेत 'मौज करा दी'

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बहुतेकांना हा व्हिडीओ आवडतो आहे. सर्वात सुंदर जोडी अशीच प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video