मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: ती तरुणी मध्यरात्री रस्त्यावर फक्त धावत असते, अन् लाखो लोकं तिला झोप मोडून पाहतात; TV वर येतो भलताच शो

VIDEO: ती तरुणी मध्यरात्री रस्त्यावर फक्त धावत असते, अन् लाखो लोकं तिला झोप मोडून पाहतात; TV वर येतो भलताच शो

गेली 15 वर्षं जपानी लोकं हा शो आवडीने पाहत आहेत. हा शो मध्यरात्री प्रसारित होत असूनही त्याची लोकप्रियता वाढत आहे, हे त्याहून विशेष.

गेली 15 वर्षं जपानी लोकं हा शो आवडीने पाहत आहेत. हा शो मध्यरात्री प्रसारित होत असूनही त्याची लोकप्रियता वाढत आहे, हे त्याहून विशेष.

गेली 15 वर्षं जपानी लोकं हा शो आवडीने पाहत आहेत. हा शो मध्यरात्री प्रसारित होत असूनही त्याची लोकप्रियता वाढत आहे, हे त्याहून विशेष.

    टोकियो, 09 जुलै: टीव्हीवर काय पाहायचं, याबद्दल प्रत्येक व्यक्तीची वेगळी मतं असतात. कुणाला अध्यात्म आवडतं, कुणाला रोमँटिक सीरियल्स, तर कुणाला थ्रिलर मालिका आवडतात. तसंच एखाद्या देशात किंवा राज्यात कोणते शोज जास्त प्रमाणात पाहिले जातात, याचाही एक पॅटर्न असतो. अलीकडच्या काळात भारतात डेली सोप्स पाहायचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे; पण जपानी लोकांची आवड मात्र अगदीच वेगळी आणि विचित्र आहे. ती आवड कसली आहे, हे सांगितलं तरी पहिल्यांदा ते कुणालाही खरं वाटणार नाही. जपानी लोकांना तरुणीला धावताना दाखवणारा शो पाहायला आवडतं. थोडीथोडकी नव्हे, तर गेली 15 वर्षं जपानी लोक हा शो आवडीने पाहत आहेत. हा शो मध्यरात्री प्रसारित होत असूनही त्याची लोकप्रियता वाढत आहे, हे त्याहून विशेष.

    TV Asahi वर प्रसारित होणारा Zenryokuzaka या नावाचा हा शो सोमवार ते गुरुवार असे आठवड्याचे चार दिवस रात्री एक वाजून 20 मिनिटांनी प्रसारित होतो. जपानमधल्या दीर्घ काळ प्रसारित होणाऱ्या (Longest Running TV Shows) टीव्ही शोजमध्ये या शोचा समावेश आहे. लोक आपली झोप मोडून हा शो पाहतात, ही आश्चर्याची बाब आहे.

    हे वाचा-Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि...

    लोक एवढ्या आवडीने पाहतात, म्हणजे या शोचा कंटेंट काही तरी वैशिष्ट्यपूर्ण असेल, असं तुम्हाला वाटलं असेल; पण तसं नाही. या शोचा प्रत्येक एपिसोड केवळ सहा मिनिटांचा असतो. त्यात ओपनिंग आणि क्लोझिंग क्रेडिट्सचाही समावेश असतो. म्हणजेच प्रत्यक्ष एपिसोडची लांबी जेमतेम पाच मिनिटं किंवा त्याहूनही कमी. या शोचा फोकस केवळ एका तरुणीवर (Running Lady) असतो. एपिसोडच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती तरुणी रस्त्यावर धावताना दिसते. तिचं धावणं संपलं, की एपिसोड संपतो. एखादी तरुणी कशी धावते, हे मध्यरात्री टीव्हीवर पाहण्यात काय हशील आहे, हे जपान वगळता जगभरातल्या कोणत्याच देशातल्या नागरिकांना अद्याप कळलेलं नाही. गेली 15 वर्षं हा शो आपली लोकप्रियता (Popularity) टिकवून आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळी तरुणी धावताना दिसते. ती कोणी तरी अभिनेत्री, मीडिया पर्सनॅलिटी किंवा कोणी तरी एंटरटेनर असते.

    " isDesktop="true" id="576410" >

    या शोची शूटिंग लोकशन्सही (Shooting Locations) फारशी बदलत नाहीत. खास करून टोकियो (Tokyo) शहरातल्या काही ठरावीक रस्त्यांवरच या शोचं शूटिंग केलं जातं. या शोचे तब्बल 3000 एपिसोड्स यू-ट्यूबवरही उपलब्ध करण्यात आले आहेत. हा शो आपण पाहिला, तर असा प्रश्न पडतो, की हे पाहताना जपानी लोकांना नेमका कोणता आनंद मिळतो? हा शो एवढा लोकप्रिय का झाला, याचं उत्तर मिळत नाही. ते जपानी लोकांच्या मानसिकतेतच दडलेलं आहे.

    SoraNews24 या जपानी मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार आता या शोमध्ये बदल होणार आहे. तो बदल म्हणजे पुरुषही त्यात धावताना दिसणार आहेत. Zenryokuzaka या शोच्या प्रेक्षकांमध्ये तरुण महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होण्यासाठी हा बदल करणार असल्याचं मालिकेच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Live video viral, Video viral, Viral