नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. काही व्हिडिओ पोट धरून हसण्यास भाग पाडतात तर काही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येतं. कुकिंग, सिंगिंग, डान्सिंग आणि मॅजिक ट्रिकपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत राहतात. यासोबतच प्रँक व्हिडिओलाही नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते. अनेकदा लोक मस्करीच्या नादात असं काही करून जातात की समोरच्याच्या हृदयाचा ठोकाच चुकतो. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Funny Prank Video Viral) झाला आहे. दूध देत नाही म्हणून म्हशीलाच पोलीस ठाण्यात घेऊन आला शेतकरी; अधिकारीही हैराण अनेकदा लोक मस्ती आणि मस्करीच्या नादात निरनिराळे प्रँक करतात. काही लोक तर समोरच्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी अनेक प्रकारचे जुगाड करतात. असंच काहीसं सध्या समोर आलेल्या व्हिडिओतील व्यक्तीनंही केलं. या व्यक्तीच्या मस्करीत समोर असलेली तरुणी मात्र चांगलीच घाबरली. या व्यक्तीच्या मस्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. काही सेकंदाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून समजतं की एक तरुणी रस्त्यावर फोटो काढण्यासाठी उभा राहिली आहे. मात्र इतक्यात एक व्यक्ती हळूच तिच्या मागे येतो आणि असं काही करतो, जे पाहून सगळेच हैराण झाले.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ही तरुणी फोटो काढण्यात व्यग्र आहे. तिची मैत्रिण तिला पोज सांगत आहे की फोटो कसा चांगला येईल. मात्र, इतक्यात एक व्यक्ती हळूच तिथे येतो आणि तरुणीच्या मागे फटाका ठेवतो. काही वेळातच फटाका फुटल्याचा आवाज येताच ही तरुणी प्रचंड घाबरते आणि ओरडतच तिथून पळ काढते. VIDEO : मगर समोर येताच महिलेनं काढली पायातली चप्पल अन्…; पाहा पुढे काय झालं हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा प्रँक व्हिडिओ लोकांना खळखळून हसण्यास भाग पाडत आहे. व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. बातमी देईपर्यंत हजारो लोकांनी हा व्ह्यूज पाहिला असून अनेक लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरला असेल.