मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दूध देत नाही म्हणून म्हशीलाच पोलीस ठाण्यात घेऊन आला शेतकरी; अधिकारीही हैराण

दूध देत नाही म्हणून म्हशीलाच पोलीस ठाण्यात घेऊन आला शेतकरी; अधिकारीही हैराण

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

  • Published by:  Meenal Gangurde

मध्य प्रदेश, 14 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भिंड जिल्ह्यातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एक शेतकरी आपली म्हैस घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. यामागील कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्याने एक संशय व्यक्त केला आहे. म्हशीवर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिने दूध देणं बंद केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. (The farmer brought the buffalo to the police station for not giving milk Officers shocked )

शेवटी हा शेतकरी मदतीसाठी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील (Video) समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलीस अधिक्षक अरविंद शाह यांनी सांगितलं की, बाबुलाल जाटव (45) यांनी शनिवारी नयागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची म्हैस गेल्या काही दिवसांपासून दूध देत नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्याने सांगितलं की, काही गावकऱ्यांनी शेतकऱ्याला सांगितलं की, म्हशीवर कोणीतरी जादूटोना केला आहे. यानंतर शेतकरी म्हशीला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आणि पोलिसांकडे मदतीचं आवाहन केलं होतं.

हे ही वाचा-दानपेटी चोरण्याआधी देवाच्या पाया पडला अन्..; ठाण्यातील चोरीचा अजब VIDEO

यावर पोलिसांनी पशूच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना दिला. त्यानंतर आज गावकरी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांचे आभार मानू लागले. कारण रविवारी सकाळी म्हशीने दूध दिल्यामुळे शेतकऱ्याची चिंता मिटली आहे.

First published:

Tags: Farmer, Madhya pradesh