नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : प्रत्येक व्यक्तीची आपल्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. वर्ष सरतात तसं आपण आपल्या पूर्वजांपासून (Ancestors) आणि त्यांच्या ओळखीपासून दूर जात राहातो. बहुदा आपल्या आपल्या आजी-आजोबांशिवाय किंवा पंजोबांशिवाय त्यामागच्या पिढ्यांबद्दलची काही माहिती नसते. इंग्लंडमधील एका युवतीला आपल्या पूर्वजांबद्दल जाणून घ्यायचं होतं. यासाठी तिनं पूर्वजांचा शोध घेणाऱ्या वेबसाईटवर ऑनलाईन डीएनए टेस्ट (Online DNA Test) घेतली. मात्र, टेस्टचे जे रिजल्ट आले, ते पाहून तिला धक्का बसला.
इंग्लंडची रहिवासी असलेली २३ वर्षीय लिडिया एलेन जेव्हा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेत होती तेव्हा तिला आपल्या मेडिकल रेकॉर्डची गरज लागली. यावेळी तिचं लक्ष लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या एमएमआर व्हॅक्सिन (MMR vaccine) सर्टिफिकेटवर पडली. सर्टिफिकेटवर व्हॅक्सिनची तारीख जुलै 1997 लिहिली होती. मात्र, लिडियाचा जन्म 1998 मध्ये झाला होता. लिडिया हे पाहून हैराण झाली. जेव्हा तिनं आपल्या आई-वडिलांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की कदाचित हे चुकीच्या पद्धतीनं छापलं गेलं आहे. लिडियानंही याकडे दुर्लक्ष केलं.
लग्नातच तरुणीनं नवरदेवाच्या मित्रासोबत ठेवले संबंध; अचानक आला हृदयविकाराचा झटका
एका वेबसाईटसोबत बोलताना लिडियानं सांगितलं, की काही वर्षांनंतर तिनं आपल्या वाढदिवसानिमित्त एन्सिस्ट्री नावाच्या वेबसाईटवरून (Ancestry Website) डीएनए टेस्ट पूर्ण करण्याचा प्लॅन केला. ही वेबसाईट अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासोबतच तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या बद्दल आणि त्यांच्या लोकेशनबद्दलही सांगते. लिडियानं सांगितलं, की असं करून तिला स्वतःलाच गिफ्ट द्यायचं होतं. लिडियानं सांगितलं, की समोर आलेल्या रिझल्टनुसार, तिचे ३५ टक्के जिन्स इंग्लंड आणि नॉर्थवेस्ट यूरोपमधील होते. नॉर्थ वेस्ट इंग्लंड प्रामुख्यानं या टेस्टमध्ये दाखवलं गेलेलं. हा रिझल्ट पाहून तिची उत्सुकता वाढली आणि तिनं याच वेबसाईटवर फॅमिली ट्री (Family Tree) बनवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर साईटवर जो रिझल्ट समोर आला तो पाहून लिडिया हैराण झाली. लिडियानं म्हटलं, मी माझा रिझल्ट पाहिला. यात सांगितलं गेलेलं की मी मूळची ब्रिटनची आहे. मात्र, जेव्हा मी फॅमिली ट्री बनवण्यासाठी वेबसाईटवर स्वतःचं नाव आणि जन्मतारीख टाकली तेव्हा समजलं, की माझ्या पूर्वजांच्या लिस्टमध्ये माझ्या नावाची कोणतीही मुलगी नाही आणि कोणाचीच जन्मतारीखही सेम नाही. हे पाहून मी हैराण झाले.
समुद्रातच युवकाला चारही बाजूंनी शार्कनं घेरलं अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
तिने पुढे सांगितलं की या यादीत माझ्या नावाचे काही लोक होते, मात्र त्यांच्या जन्मतारखा वेगळ्या होत्या. हे पाहून माझ्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले. हे पाहून मला वाटलं की जर हे माझे पूर्वज नाहीत, तर कदाचित मी कोणाचीच वंशज नाही. मला माझ्या अस्तित्वावरच संशय येऊ लागला. लिडियानं टिकटॉकवर व्हिडिओ शेअर केला आहे. यावर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, लोकांच्या कमेंटनंतर लिडिया अखेर हे मानण्यास तयार झाली आहे, की या वेबसाईटवर तिचा रेकॉर्ड कदाचित यामुळे नसावा कारण ती कुठेही अजून शिफ्ट झालेली नाही आणि तिचं अद्याप लग्नही झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news