नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : सोशल मीडियावर सतत काही ना काही अजब घटना (Weird Incident) समोर येत असतात. इथे अनेकदा तुम्हाला अशा काही घटना ऐकायला मिळतील, ज्या हैराण करतील. सध्या सोशल मीडिया साईट रेडिवर (Social Media Site Reddit) अशीच एक घटना चांगलीच व्हायरल झाली आहे. एक महिलेनं आपल्या इंटिमेट मूमेंटबद्दलची (Intimate Moment) एक गोष्ट शेअर केली आहे, जी जाणून सगळेच हैराण झाले आहेत.
आई-वडिलांपासून लपवून मुलगी करायची हे काम; सत्य समोर येताच हादरले कुटुंबीय
नुकतंच रेडिटच्या एका ग्रुपवर महिलेनं तिच्यासोबत घडलेली अजब घटना शेअर केली. महिलेनं सांगितलं, की एकदा ती आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात (Best Friend Wedding) गेली होती. तिथेच तिला नवरदेवाचा एक मित्र फार आवडला. पहिल्यांदाच ही तरुणी या व्यक्तीला भेटली होती. याआधी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिनं या व्यक्तीसोबत बातचीत केली होती, मात्र तेव्हा तिची मैत्रीण आणि मैत्रिणीचा होणारा नवराही तिथेच उपस्थित होते. तरुणीनं सांगितलं की तिनं लग्नात या युवकासोबत भरपूर गप्पा मारल्या आणि डान्सही केला. लग्नाच्या वेळी ते एकमेकांसोबतच होते. लग्न पूर्ण होताच दोघंही रात्री एका हॉटेलच्या रूममध्ये थांबले आणि दोघांनी रोमान्स (Romance) केला.
महिलेनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं, की तो तिच्या जीवनातील सगळ्यात खास अनुभव होता. मात्र, रोमान्स करत असतानाच तिच्या छातीत दुखू लागलं आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला (Heart Attack During Sex). युवकानं लगेचच तिच्या पाठीवर हात फिरवण्यास सुरुवात केली आणि तिला पिण्यासाठी पाणी दिलं. रात्रभर तो तिच्यासोबत जागाच राहिला. तरुणीनं सांगितलं, की हा युवक तिची करत असलेली काळजी पाहून तिला बरं वाटलं, मात्र आपल्या प्रकृतीसाठी तिला भीती वाटत होती.
वहिनी घरी येताच दिरानं केलं असं काही की पाहून सगळेच हैराण, VIDEO VIRAL
दुसऱ्याच दिवशी ती डॉक्टरांकडे गेली आणि तिनं ही संपूर्ण घटना सांगितली. डॉक्टरांनी तिला सांगितलं, की कदाचित तिला हृदयविकाराचा झटका आलेला असू शकतो कारण फिजिकल वर्कदरम्यान हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तिची ईकेजी टेस्टही नॉर्मल आली. मात्र, डॉक्टरांनी तिला कार्डियोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. महिलेनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की कार्डियोलॉजिस्टनंही तिला हेच सांगितलं, मात्र दोन डॉक्टरांजवळ आपला तो खासगी क्षण सांगताना तिला भरपूर लाज वाटली. महिलेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिला सांगितलं की शारीरिक संबंधांरदरम्यान हे सर्व होणं नॉर्मल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news