जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं दिली अजब शिक्षा; आधी आग लावली अन् मग.., VIDEO

वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं दिली अजब शिक्षा; आधी आग लावली अन् मग.., VIDEO

वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं दिली अजब शिक्षा; आधी आग लावली अन् मग.., VIDEO

शाळा आता मुलांना शिक्षा देण्यासाठी वेगळ्याच पद्धती वापरत आहेत (Weird Punishment to Students). यात शाळेतून काढून टाकण्यापासून हजेरी न लावणं आणि परीक्षेला न बसू देणं, अशा शिक्षांचा समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : पूर्वीच्या काळी शिक्षक मुलांना छडीने मारत असे. मस्ती करणारी मुलं शिक्षकांच्या छडीलाच प्रचंड घाबरत असे. मात्र काळासोबत लहान मुलांसाठी अनेक सोशल ग्रुप बनले आणि आता शिक्षकांनी मुलांना मारल्यास शिक्षकच अडचणीत येतात. यामुळे आता मुलं शिक्षकांच्या छडीला घाबरणं बंद झालंय. मात्र, अनेक शाळा आता मुलांना शिक्षा देण्यासाठी वेगळ्याच पद्धती वापरत आहेत (Weird Punishment to Students). यात शाळेतून काढून टाकण्यापासून हजेरी न लावणं आणि परीक्षेला न बसू देणं, अशा शिक्षांचा समावेश आहे. युद्ध स्मारक पाहायला गेलेली महिला; शहिदांमध्ये भावाचं नाव पाहताच…, VIDEO मागील काही काळापासून मात्र इंडोनेशियातील एका शाळेची शिक्षा देण्याची अजब पद्धत चांगलीच चर्चेत आहे. शाळेच्या या अजब शिक्षेच्या पद्धतीसाठी काहींनी कौतुक केलं आहे तर काहींनी हे अतिशय वाईट असल्याचं म्हटलं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात मस्ती करणाऱ्या मुलांचे महागडे फोन टीचरने आगीमध्ये टाकले होते. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात शिक्षिका शाळेतील मस्ती करणाऱ्या मुलांच्या काही वस्तू आगीमध्ये टाकताना दिसत आहे, यात त्यांचे शूजही आहेत (Teacher Burned Shoes of Students).

जाहिरात

सोशल मीडिया साईट ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात एक महिला शिक्षिका मुलांचे शूज जाळात टाकताना दिसते. शिक्षा म्हणून मुलांच्या वस्तू खराब करण्याचं सत्र इंडोनेशियामध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. पालकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शिक्षिकेच्या हातामध्ये दोन शूजच्या जोड्या दिसत आहेत. शिक्षिका हे शूज आगीमध्ये फेकते. ट्विटमधील माहितीनुसार, मुलांनी शाळेचे नियम तोडल्याने हे केलं गेलं आहे. मात्र अद्याप हे समजू शकलेलं नाही की मुलं क्लासमध्ये असं नेमकं काय करत होती. परंतु क्लास सुरू असताना मुलांचं बोलणं शिक्षिकेला आवडलं नव्हतं, असं म्हटलं जात आहे.

शेकडो फूट उंचावरील दोरीवर चालत होता, तोल गेला अन्…; थरकाप उडवणारा Video

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, इंडोनेशियामधील काही मुलांनी नियम तोडल्याने शिक्षिकेला राग आला. यामुळे शिक्षा म्हणून या मुलांचे शूज शिक्षिकेनं जाळले. इंडोनेशियातून समोर येणाऱ्या या व्हिडिओवर लोकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी हे एकदम चुकीचं असून मुलांच्या वस्तू जाळणं बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी ही अगदी बरोबर पद्धत असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात