मराठी बातम्या /बातम्या /Viral /'आई किचनमध्ये काम करते, जेवणं झाली तर निघा घरी', पोराने वडिलांच्या मित्रांना सुनावले, VIDEO

'आई किचनमध्ये काम करते, जेवणं झाली तर निघा घरी', पोराने वडिलांच्या मित्रांना सुनावले, VIDEO

 पाहुण्यांपैकी एकानं त्यांचं कौतुक केलं. 'अरे वा! ही छोटी मुलं आपल्या वडिलांना मदत करत आहेत,' असं म्हटल्यानंतर त्यातला छोटा मुलगा,

पाहुण्यांपैकी एकानं त्यांचं कौतुक केलं. 'अरे वा! ही छोटी मुलं आपल्या वडिलांना मदत करत आहेत,' असं म्हटल्यानंतर त्यातला छोटा मुलगा,

पाहुण्यांपैकी एकानं त्यांचं कौतुक केलं. 'अरे वा! ही छोटी मुलं आपल्या वडिलांना मदत करत आहेत,' असं म्हटल्यानंतर त्यातला छोटा मुलगा...

    मुंबई, 12 जानेवारी : लहान असो वा मोठे, सगळ्यांना सर्वाधिक प्रिय असते ती आपली आई (Mother). लहान मुलांचं तर सगळं विश्वच आईभोवती गुंफलेलं असतं. आपल्या आईला कसलाही त्रास होऊ नये, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे अत्यंत निरागसपणे लहान मुलं आपल्या परीनं आपल्या आईची काळजी घेत असतात. आईच्या काळजीपोटी, घरी आलेल्या पाहुण्यांनाही सुनवायला कमी न करणाऱ्या एका चिमुरड्यानं सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांचं मन जिंकलं आहे.

    आपली आई तासनतास किचनमध्ये (Kitchen) राबत आहे, हे बघून सात्त्विक संताप आलेला हा मुलगा घरी आलेल्या पाहुण्यांना 'आता लवकर जेवा आणि सरळ घरी जा!' असं चिडून सांगत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटरवरची (Twitter) ही व्हिडिओ क्लिप अनेकांनी शेअर केली आहे. स्त्रीने हसतमुख राहून घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे, घरातल्या पुरुषांसाठी जेवण बनवलं पाहिजे, त्यांचे सगळे हुकूम मानले पाहिजेत अशी धारणा आजही अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे घरी काहीही कार्यक्रम असेल तर घरातली गृहिणी एकटी किचनमध्ये राबत असते, हे सार्वत्रिक चित्र आहे. तसंच चित्र असलेल्या एका घरातल्या चिमुरड्याने आईसाठी उठवलेला हा आवाज आहे. त्याची ही कृती त्याच्या आईवरच्या अपार प्रेमाची साक्ष आहे.

    हा व्हिडिओ एखाद्या अरेबियन देशातला असल्याचं दिसत आहे. यात एका घरात काही पुरुष मंडळी जेवणाच्या मोठ्या टेबलाभोवती बसली असून, हास्यविनोद, गप्पांमध्ये मग्न आहेत. तीन छोटी मुलं जेवणाचे पदार्थ आणून टेबलावर ठेवत आहेत. ते बघून पाहुण्यांपैकी एकानं त्यांचं कौतुक केलं. 'अरे वा! ही छोटी मुलं आपल्या वडिलांना मदत करत आहेत,' असं म्हटल्यानंतर त्यातला छोटा मुलगा, जो पाच-सहा वर्षांचा असावा, तो एकदम चिडून म्हणतोय, की 'पाहुणे (Guest) कोण आहेत? तुमचं अजिबात स्वागत (Not Welcome) नाही. माझी आई (Mother) कालपासून किचनमध्ये राबतेय. तेव्हा आता जेवा आणि सरळ तुमच्या घरी जा!'

    (नोकरीचं क्षेत्र कोणतंही असो आता होणार फक्त तुमचीच चर्चा; 'हे' Skills असणं आवश्यक)

    सात्त्विक संतापातून आलेलं त्याचं हे बोलणं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्याचे वडील आणि पाहुणेही क्षणभर स्तब्ध झाले. नंतर मात्र ते आपलं हसू रोखू शकले नाहीत आणि सगळेजण हास्यकल्लोळात बुडून गेलेले दिसत आहेत. ही छोटीशी व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे.

    या छोट्या मुलानं आपल्या आईविषयीची काळजी, निर्व्याज प्रेम आपल्या कृतीतून व्यक्त केलं आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास झाला तर लहान मुलं काहीही करू शकतात, याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या या वक्तव्यातून त्यानं सगळ्या पुरुषांनाही वास्तवाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे हा निरागस चिमुरडा सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे.

    First published: