व्हिडीओत पाहू शकता नवरा नवरी एका फ्रेमसमोर उभे आहेत. त्यावेळी त्यांना चपला काढायला सांगितल्या जातात. तेव्हा नवरदेव स्वतःच खाली झुकून आपल्या चपला काढतो. अन् नवरीच्या मदतीसाठी धावत तिची मेहुणी येते. त्यावेळी मग एक तरुण नवरदेवाच्याही मदतीला येतो. नवरदेवाने काढलेल्या चपला तो उचलणार असतोच की इतक्यात मागून नवरदेवाची दुसरी मेहुणी येते. ती नवरदेवाच्या पायाखालून हात टाकून त्याच्या चपला पळवून नेते. हे वाचा - नवरीला पाहताच मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; VIDEO पाहून नेटकरीही भावुक थोडा वेळ नवरदेवालाही कळत नाही की नेमकं काय चाललं आहे. पण जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा मेहुणी आपल्या चपला घेऊन फरार झाली हे त्याला समजतं. बिचारा नवरदेव गुपचूप आपली मान खाली घालतो. सर्वजण हसू लागतात. तेव्हा नवरदेवही हसताना दिसतो. पण अगदी मनमोकळेपणाने हसताना दिसत नाही. कारण मेहुण्यांनी पाहुण्यांसमोरच त्याची चांगली फजिती केलेली आहे. हे वाचा - नवरदेव बूट देईना म्हणून सटकली; लग्नमंडपातच मेहुणीने भावोजीसोबत काय केलं पाहा VIDEO एंजल पीटर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video