सध्या सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आहे. सोशल मीडिया हे जसं मनोरंजनाचं साधन आहे, तसंच ते ब्रँडिंग (Branding) आणि पैसे कमावण्याचंदेखील साधन बनलं आहे. अनेक युझर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करताना दिसतात. यातून प्रसिद्धी आणि पैसा अशी दोन्ही उद्दिष्टं साध्य होतात. अनेक ऑनलाइन इन्फ्लुएन्सर्स (Online Influencer) पोस्टच्या माध्यमातून पैसे कमावतात. जितके फॉलोअर्स (Followers) जास्त तितका मिळणारा पैसा अधिक. सोशल मीडियावर आता लहान मुलं, तशीच कुत्र्यांचीही प्रोफाइल्स पाहायला मिळतात. सोशल मीडियावर आता जगातली पहिली डॉग एजन्सी (Dog Agency) कार्यरत झाली असून, ही एजन्सी कुत्र्यांना इन्स्टा फेमस (Insta famous) बनवते. ही एजन्सी पाळीव कुत्र्यांना प्रशिक्षित करते. या कुत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आणलं जातं आणि या माध्यमातून त्यांना (म्हणजेच त्यांच्या मालकांना) श्रीमंत बनवलं जातं. थोडासा अनोखा वाटणारा हा प्रकार सध्या कमाई आणि ब्रँडिंगसाठी महत्त्वाचं साधन ठरत आहे. हे वाचा - VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण लोनी एडवर्डने द डॉग एजन्सी नावानं कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी मार्केटिंगच्या माध्यमातून कुत्र्यांना इन्स्टा फेमस बनवते. एके काळी वकील असलेल्या लोनीने कुत्र्यांना सोशल मीडिया स्टार बनवण्यासाठी ही कंपनी सुरू केली. सध्या तिचे अनेक क्लायंट आहेत. यात प्रसिद्ध सेलिब्रिटीजच्या कुत्र्यांचाही समावेश आहे. लोनीची एजन्सी ही केवळ कुत्र्यांनाच नव्हे, तर मांजर, डुक्कर, बदक आणि अगदी बेडकांनाही प्रशिक्षण देते. अशी सुचली कल्पना लोनीनं हार्वर्डमधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर 2013 मध्ये तिनं तिच्याकडच्या फ्रेंच बुलडॉग क्लोए या कुत्र्याचं इन्स्टाग्राम (Instagram) पेज तयार केलं. या पेजला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आणि या पेजचे लाखो फॉलोअर्स झाले. या पेजला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून लोनीनं अन्य व्यक्तींनाही त्यांच्या कुत्र्याचं पेज सुरू करावं, अशी विनंती केली. त्यानंतर 2015मध्ये लोनीनं द डॉग एजन्सी सुरू केली. यानंतर लोनीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक मोठ्या व्यक्ती तिच्या क्लायंट बनल्या आणि लोनी अल्पावधीतच अब्जाधीश बनली. हे वाचा - OMG! या मुलीच्या डोळ्यांतून आसवांसोबत टपकतात खडे, डॉक्टरही हैराण; पाहा VIDEO अशी करतात कमाई लोनीची द डॉग एजन्सी ही कंपनी पाळीव जनावरांना इन्स्टा सेलिब्रिटी बनवते. यामुळं कुत्रे प्रसिद्धीच्या झोतात येतात आणि त्यांचे फॉलोअर्स वाढतात. `माझ्या क्लायंटची कमाई कुत्र्यांचे कपडे, त्यांची ज्वेलरी आणि खाद्यपदार्थांमुळे वाढते. अनेक कंपन्या इन्स्टाफेमस कुत्र्यांना त्यांच्या ब्रँडचे कपडे परिधान करण्यास देऊन कंपनीचं ब्रँडिंग करतात. या बदल्यात कुत्र्यांच्या नावे पेमेंट केलं जातं,` असं लोनी एडवर्डने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.